Health Tips: हाय बीपीवर ताबडतोब नियंत्रण ठेवायचं असेल तर 'अशा' प्रकारे खा काळी मिरी; बीपी लगेच कमी होईल

काळ्या मिऱ्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जसे - पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे.

If you want to control high BP immediately eat black pepper in this way, it will decrease immediately

1/9
भारतात फार जुन्या काळापासून पर्यायी औषधे म्हणून मसाल्यांचा वापर केला जात आहे. मसाल्यांचा उपयोग अनेक आजार दूर करण्यासाठीही केला जातो. (Photo Credit : pexels )
2/9
काळ्या मिऱ्यांमध्ये काही घटक असतात, जे अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, असे संशोधनात दिसून आले आहे. म्हणजेच ते शरीरातील पेशींचे रक्षण करतात. तसेच काळी मिरी रक्ताच्या शिरा साफ करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तदाब आणि उच्च रक्तदाब बरा होतो. (Photo Credit : pexels )
3/9
काळ्या मिऱ्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जसे - पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे. (Photo Credit : pexels )
4/9
याशिवाय काळ्या मिऱ्यांमध्ये जीवनसत्त्व ए, ई, सी देखील आढळते. इतकेच नाही तर काळ्या मिऱ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स नावाचे काही घटक देखील असतात. ते आपल्या पेशींचे रक्षण करतात, या गुणधर्मामुळे काळी मिरी अनेक आजारांमध्ये मदत करते. (Photo Credit : pexels )
5/9
त्याचबरोबर, यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते आणि घसा खवखवण्यामध्ये आराम मिळतो. (Photo Credit : pexels )
6/9
उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या आहे, जी कधीकधी जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवते. काळ्या मिऱ्यांमध्ये 'पिपेरिन' नावाचे रसायन असते, जे रक्तवाहिन्यांना आराम देते आणि रक्ताचा योग्य प्रवाह राखण्यास मदत करते. (Photo Credit : pexels )
7/9
यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करते आणि सोडियमचे संतुलनही राखते. रोज याचा वापर केल्यास काही दिवसांतच त्याचा परिणाम दिसेल. (Photo Credit : pexels )
8/9
सकाळी रिकाम्या पोटी उठताच एक ग्लास गरम पाण्यात १ ते २ काळी मिरीचे दाणे मिसळावे. पाण्याचे तापमान सहन होत नसेल तर कोमट पाण्याचाही वापर करता येतो. हे मिश्रण प्यावे. रोज सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने बीपी नियंत्रणात राहतो. (Photo Credit : pexels )
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
Sponsored Links by Taboola