रोज रात्री 9 नंतर जेवताय? ही सवय तुमच्या हृदयासाठी घातक ठरू शकते!
संशोधनानुसार, ही छोटी जीवनशैलीतील सवय तुमचं हृदय निरोगी ठेवू शकते, झोपेची गुणवत्ता वाढवते, वजन नियंत्रणात ठेवते आणि दीर्घायुष्य देण्यास मदत करते.
Continues below advertisement
Heart Stroke
Continues below advertisement
1/10
रात्री उशिरा ऑफिसमधून घरी येऊन 9 वाजता जेवण घेणं, कामाच्या मध्ये पिझ्झा किंवा स्नॅक्सवर ताव मारणं ओळखीचं वाटतंय ना? पण आता संशोधन सांगतंय की या सवयी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
2/10
‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, रात्री 7 ते 8 वाजण्याआधी जेवण घेणं हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या कमी करतं ,विशेषत महिलांमध्ये.
3/10
ज्या लोकांनी नियमितपणे रात्री 9 नंतर शेवटचं जेवण केलं, त्यांना स्ट्रोक आणि इतर हृदयविकारांचा 28 टक्क्यांपर्यंत अधिक धोका असल्याचं निष्कर्षांमध्ये आढळलं आहे.
4/10
आपलं शरीर ‘सर्केडियन रिदम’ नावाच्या नैसर्गिक जैविक घड्याळावर चालतं. हे पचन, मेटाबॉलिझम आणि हृदयाची कार्यप्रणाली नियंत्रित करतं. लवकर जेवण केल्याने अन्नपचन या रिदमनुसार होतं, त्यामुळे शरीराला पोषणघटक नीट शोषता येतात.
5/10
रात्री ९ नंतर जेवण केल्यास ही लय बिघडते आणि महिलांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढतो, असं या अभ्यासात नमूद केलं आहे.लवकर जेवण घेतल्यास शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
Continues below advertisement
6/10
त्यामुळे ऍसिडिटी, गॅस, फुगलेपणा आणि पोटातील जडपणा कमी होतो. उशिरा जेवण केल्याने झोपेचा चक्रही बिघडतं आणि थकवा जाणवतो. रात्री 7 वाजेपर्यंत जेवण केल्यास शरीर पचन पूर्ण करून नैसर्गिकरित्या शांत झोपेत जातं.
7/10
‘टाइम-रिस्ट्रिक्टेड ईटिंग’ म्हणजेच ठराविक वेळेत खाणं, हे वजन नियंत्रणासाठी प्रभावी मानलं जातं. साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि उशिरा खाणं किंवा स्नॅक्सवर ताव मारणं टाळलं जातं.
8/10
अनेकदा कामाच्या वेळा, वाढलेला स्क्रीनटाईम आणि आपल्या बिझी आयुष्यात 7 च्या आधी जेवण करणे थोडे कठीण वाटू शकते. दररोज ठराविक वेळी, शक्यतो रात्री 7 वाजण्यापूर्वी जेवा.
9/10
जेवणाची तयारी आधी करून ठेवल्यास उशिरा जेवणाची सवय कमी होते. भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि कमी तेलकट पदार्थांचा समावेश करा.जेवणानंतर हलकं चालणं पचन सुधारतं आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतं.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 13 Oct 2025 12:24 PM (IST)