Heart Attack : तुमच्या 'या' सवयी वाढवू शकतात हार्ट अॅटकचा धोका
मागील काही वर्षात हार्ट अॅटकचा सामना करावा लागणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलती जीवनशैली आणि तणाव यामुळे हृदयविकारग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.
तुमच्या काही सवयी हृदयविकाराच्या आजाराला निमंत्रण देऊ शकतात.
तुम्ही काही सवयी बदल्यास तुम्हाला हृदयविकाराच्या आजाराला दूर ठेवता येईल.
मद्यपान आणि धूम्रपानाचे व्यसन असेल तर या व्यवसनापासून दूर राहा
या व्यसनांमुळे हृदयविकाराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या वाढू लागली आहे.
शरीराचा लठ्ठपणा वाढल्यास इतर आजाराला निमंत्रण मिळू शकते. यात हृदयविकाराचाही समावेश आहे.
अनेकजण नाश्ता, जेवण, आरामाच्या वेळा चुकवतात. कोणत्याही वेळी जेवण, आराम करतात. या सवयी हृदयासाठी चांगल्या नाहीत.
सकस आहार घ्यावा. मैदा, साखरेच्या पदार्थांचे अतिसेवन टाळावे. जंक फूड्सपासून दूर राहावे.
तणावापासून दूर राहा. तणाव मुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्न करा. तणावामुळे हार्ट अॅटकचा धोका निर्माण होतो.