Health Tips: जेवल्यानंतर लगेच चुकूनही करू नका 'ही' कामं; शरिरावर होईल वाईट परिणाम
जेवल्यानंतर लगेच आंघोळ करु नये: जेवल्यावर लगेच अंघोळ केल्यावर चयापचय दर कमी करते. परिणामी पचनाच्या समस्या निर्माण होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेवल्यानंतर लगेच झोपू नका: जेऊन लगेच झोपल्यामुळे अन्न पचनाची प्रक्रिया मंदावते, त्यामुळे शरीरात चरबी जमा होते.
जेवल्यानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका: जेवल्यानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात, असं केल्याने वजन वाढतं.
जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नका: काही खाल्ल्यानंतर लगेच हेवी व्यायाम करणं योग्य नाही. सायकलिंग, जॉगिंग, स्वीमिंगसारख्या क्रिया जेवणानंतर लगेच करत असाल तर अन्न पचण्याऐवजी तुम्हाला उलट्या होतील.
जेवणानंतर धूम्रपान करू नका: अनेकांना जेवल्यानंतर लगेच सिगारेट प्यायची तलफ होते, पण असं केल्याने शरीरात निकोटीनचं प्रमाण अधिक वाढतं आणि लिव्हरवर देखील याचा परिणाम होतो.
जेवणानंतर चहा पिऊ नका: जेवल्यावर लगेच चहा किंवा कॉफी प्यायल्याने देखील शरिरात निकोटीनचं प्रमाण वाढतं, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
जेवल्यानंतर फळं खाऊ नका: अनेक वेळा लोक जेवल्यानंतर फळं खातात, पण असं करणं शरिरासाठी खूप हानिकारक ठरू शकतं. जेऊन लगेच फळं खाल्ल्याचे पचनाला त्रास होतो.
जेवणानंतर जड काम करु नका: काही खाऊन लगेच कोणतंही जड काम न करणं चांगलं आहे. खाल्ल्यानंतर शरीराला विश्रांतीची गरज असते.
जेवल्यानंतर लगेच जास्त चालू नये: जेवणानंतर चालल्याने अन्नपचन होतं, असा अनेकांचा समज असला तरी तसं होत नाही. शरीरातील पचनक्रियेसाठीही ऊर्जा लागते आणि आपण जास्त चाललो तर ती ऊर्जा चालण्यात खर्च होते, असं केल्याने पचनावर परिणाम होतो.
जेवल्यानंतर या सर्व गोष्टी करणं टाळल्यास तुमची पचनक्रिया चांगली होईल आणि आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.