Health Tips : दम्याची लक्षणं टाळण्यासाठी 'या' फळभाज्यांचा आहारात समावेश करा
दमा हा देशभरात सामान्य आजार झाला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वर्ग त्याला बळी पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिमला मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी आणि फायटोन्यूट्रिएंट्सचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
आल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. हे तणाव टाळण्यासाठी आणि शरीराच्या डीएनएला होणारे नुकसान टाळण्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. रक्तदाब, हृदयविकार आणि फुफ्फुसाचे आजार अशा अनेक आजारांशी लढण्यासाठीही हे फायदेशीर आहे.
टोमॅटो ज्यूसमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. लाइकोपीन सारख्या अँटिऑक्सिडंटचा समृद्ध स्रोत असल्याने, ते हृदयरोग आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.
एवोकॅडोमध्ये निरोगी चरबी आणि फायबर, मॅग्नेशियम, बी-6, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, फोलेट भरपूर असतात. त्यामुळे श्वसनाचे आजार टाळण्यास मदत होते.
सफरचंदात फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. हे वजन कमी करण्यास आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. सफरचंद मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या अनेक आजारांपासून बचाव करण्यास देखील मदत करतात.
डाळिंबात फायबर, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे सेलचे नुकसान टाळण्यास मदत करते. त्यामुळे डाळिंबदेखील खूप फायदेशीर आहे.
फरस्बीमध्ये व्हिटॅमिन ए-सी-के, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यात आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हिरव्या शेंगामध्ये असलेले व्हिटॅमिन-बी तुम्हाला नैराश्य कमी करण्यास मदत करू शकते.
पालक : पालक या सुपर फूडमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-के, फायबर, फॉस्फरस, थायामिन आणि व्हिटॅमिन-ई सारखे पोषक घटक असतात. त्वचा, केस आणि हाडांच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. दम्याची लक्षणे कमी करण्यात देखील हे तुम्हाला मदत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.