Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips: वाईट आठवणी विसरण्याचा प्रयत्न करताय? तर 'या' टिप्स येतील कामी
तुमच्या वाईट अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. आयुष्यातील एक वाईट क्षण तुम्हाला खूप काही शिकवून जातो. वाईट अनुभव विसरणं सोपं नसलं तरी त्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका, या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमच्याजवळ जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्यासोबत कोण उभं आहे, कोण तुम्हाला साथ देत आहे, याकडे लक्ष द्या आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा. असं केल्याने वाईट आठवणी कालांतराने मिटून जातील.
वाईट आठवणींशी संबंधित भावना स्वीकारा, असं केल्याने तुम्हाला राग येईल आणि त्रास होईल. पण ही भावना दूर करणं फार गरजेचं आहे. रागावणं आणि रडणं यामुळे मन हलकं होतं. जर तुम्ही असं करत असाल तर समजून घ्या की, ही तुम्ही ठीक होत असल्याचं हे पहिलं पाऊल आहे.
कोणत्याही वाईट अनुभवासाठी स्वतःला दोष देणं थांबवा. असं केल्याने तुम्ही स्वतःला निगेटीव्ह झोनमध्ये घेऊन जात आहात. जे घडलं ते स्वीकारा आणि त्या टप्प्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
जर जुन्या गोष्टी तुम्हाला शांतपणे जगू देत नसतील, तर तुमच्या मनाची स्थिती जवळच्या विश्वासू मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला सांगा. कोणाशी बोललं तर योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. तुमचं मनही हलके होऊ शकतं, हे तुम्हाला बरं करण्यात मदत करू शकतं.
जुन्या गोष्टी विसरण्यासाठी स्वत:ला नेहमी व्यस्त ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही कधीही रिकामं राहू नका. काही ना काही कामात स्वतःला व्यस्त ठेवा.