Health Tips: जेवल्यानंतर लगेच 'या'गोष्टी करणं टाळा; अन्यथा आरोग्यावर होतील वाईट परिणाम
Health Tips: रोजच्या जीवनात जेवण केल्यानंतर लगेच आपण काही अशा चुका करतो, ज्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. जेवल्यानंतर लगेच काय करू नये हे जाणून घेऊया.
Health Tips
1/6
जेवणानंतर अंघोळ करणे: जेवणानंतर अंघोळ करणे ही सवय शरीरासाठी घातक ठरु शकते, याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. या चुकीमुळे वजन वाढणे, अपचन, अॅसिडीटी या आजारांना निमंत्रण मिळेल. त्यामुळे जेवणानंतर अंघोळ करणाऱ्या व्यक्तींनी लगेचच ही सवय बदला.
2/6
जेवणानंतर लगेच झोपणे: जेवल्यानंतर लगेच झोपू नका, असं केल्याने खाल्लेलं जेवण पचत नाही. अन्न पचनाची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे शरीरात चरबी जमा होते.
3/6
जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिणे: जेवल्यानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात आणि वजन देखील वाढते.
4/6
जेवल्यानंतर लगेच हेवी व्यायाम करणे: काही खाल्ल्यानंतर कोणताही हेवी व्यायाम करु नये. जर तुम्ही पोहणे, सायकलिंग, जॉगिंग असे व्यायाम करत असाल तर अन्न पचण्याऐवजी तुम्हाला उलट्या होतात. खाल्ल्यानंतर शरीराला विश्रांतीची गरज असते.त्यामुळे कोणतीही जड वस्तू देखील उचलू नये.
5/6
जेवणानंतर धुम्रपान करणे: काही लोकांना जेवणानंतर धुम्रपान करण्याची सवय असते. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही, यामुळे तुमचे वजन वाढते.
6/6
जेवणानंतर फळं खाणे: अनेकदा लोक जेवण झाल्यानंतर लगेचच फळं खाताना दिसतात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, जेवणानंतर लगेचच फळं खाल्याने अॅसिडीटी होते.
Published at : 25 Jun 2023 07:45 PM (IST)
= 6">