Health Tips : 'या' सवयींमुळे दात लवकर खराब होतात; वेळीच दातांची योग्य काळजी घ्या
जास्त गोड खाणे देखील दातांसाठी हानिकारक असते, त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्हाला वाटत असेल की दात जोरात घासले की दात लवकर साफ होतात तर हा तुमचा गैरसमज आहे. दात जोरात घासल्याने दात खराब होतात आणि हिरड्यांनाही सूज येते.
जर तुम्ही तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ एकच ब्रश वापरत असाल तर ते तुमच्या दातांनाही हानी पोहोचवू शकते. डॉक्टरांचा असा सल्ला आहे की टूथब्रशचा वापर 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ करू नये. ब्रश वेळीच चेंज करावा.
तंबाखू चघळल्याने दातांमधील नसांमध्ये रक्त कमी होते, त्यामुळे हिरड्या आणि दात दोन्ही खराब होतात.
सध्या दातांनी बाटलीचं झाकण उघडण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. लोकांना हे करणं गंमत वाटते. पण यामुळे दातांना खूप नुकसान होऊ शकते.
दातामध्ये एखादी गोष्ट अडकली तर लोक टूथपिकने ते काढण्याचा प्रयत्न करतात, असे केल्याने दाताला इजा होऊ शकते आणि सोबतच हिरड्यांवरदेखील परिणाम होऊ शकतो.
अनेकजण सहसा तणावात किंवा टेंन्शनमध्ये असताना दात घासतात. ही सवय दातांसाठी देखील हानिकारक ठरू शकते.
अनेकांना उन्हाळ्यात बर्फ चघळायला आवडते, असे केल्याने तुमच्या दातांचा इनॅमल खराब होतो.