H3N2 Influenza : H3N2 पासून बचाव करायचाय? 'हे' उपाय करा
त्यामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. नागरिकांनी या संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पार्श्वभूमीवर दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी नागरिकांना घाबरुन न जाता योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
डॉ. रणदीप गुलेरिया यांनी H3N2 इन्फ्लुएंझापासून बचाव करण्यासाठी कोविड उपायांचा वापर करण्यास सांगितलं आहे.
वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगानंही नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
डॉ. रणदिप गुलेरिया यांनी H3N2 इन्फ्लुएंझापासून बचाव करण्यासाठी कोविड उपायांचा अबलंब करण्यास सांगितलं आहे. मास्क, लस आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
H3N2 इन्फ्लुएंझा हा कोविडप्रमाणे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. हा संसर्ग खोकल्याद्वारे पसरतो. म्हणूनच आपण मास्क वापरावा, हात नियमित धुवावेत आणि सामाजिक अंतर पाळलं पाहिजे.
मधुमेह तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे.
ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत.
देश आता कुठे कोरोनातून सावरत असताना H3N2 व्हायरसनं चिंता वाढवली आहे. भारतात H3N2 इन्फ्लूएंझाच्या दोन रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
H3N2 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या इन्फ्लूएंझापासून गंभीर आजाराचे रुग्ण आणि वृद्धांनी काळजी घेणं गरजेचं आहे.