Exercise And Fitness Tips: वर्कआउट करण्यापूर्वी या गोष्टी खाऊ नका, अन्यथा मोठं नुकसान होईल
असे काही पदार्थ आहेत जे सामान्यतः हेल्दी मानले जातात. मात्र, जर हे पदार्थ व्यायामापूर्वी खाल्ले तर अडचण होऊ शकते. यामुळे तुम्ही योग्य व्यायाम करू शकत नाही. दूध, दही, तूप याशिवाय दुग्धजन्य पदार्थ आणि अन्नधान्य या व्यतिरिक्त इतर वस्तू या यादीत समाविष्ट आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यादीतील पहिल्यांदा फायबर युक्त पदार्थ येतात. फायबर आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहेत. परंतु, व्यायामापूर्वी फायबर खाऊ नका कारण ते पचायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत तुम्हाला व्यायामादरम्यान गॅस, मळमळ, पोटात पेटके यासारख्या समस्या येऊ शकतात.
दुग्धजन्य पदार्थ जसे दूध, तूप, चीज, पनीर नेहमी व्यायामानंतर खावे. यात असलेल्या फॅटमुळे तुम्हाला आळस आल्यासारखं वाटू शकते आणि वर्कआउट्स दरम्यान पोटातील आम्ल वाढवू शकते.
हेल्दी फॅट्स आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. मात्र, व्यायामापूर्वी घेतलेले फॅट्स चांगले नाही. सुकामेवा हा त्याचाच एक भाग आहे. हे पचन मंद करते. वर्कआउट करण्यापूर्वी तुम्ही जे काही खाल्ले आहे ते पूर्णपणे पचायला हवे.
तहान शमवण्यासाठी कार्बोनेटेड किंवा फ्रिजी ड्रिंक जसे सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स इत्यादी घेऊ नका. हे देखील सामान्यतः चांगले मानले जात नाहीत. विशेषत: व्यायामापूर्वी घेतल्यास गॅस किंवा अॅसिडिटी समस्या उद्भवू शकते.
मसालेदार किंवा तळलेलं अन्नामुळे अपचन आणि अॅसिडिटी होऊ शकते. व्यायामापूर्वी विशेषतः तळलेल्या पदार्थामुळे आम्लपित्त होऊ शकते. जर अपचनामुळे अन्न घशात आले तर आम्लामुळे घसा खराब होऊ शकतो.
रिफाइन्ड साखर किंवा त्यातून बनवलेले पदार्थ देखील व्यायामापूर्वी घेऊ नयेत. यामुळे थकवा आणि सुस्ती देखील येते. तुम्ही व्यायामानंतर मिठाई घेतली तर ते अधिक चांगले होईल, तेही कोणत्याही फळाप्रमाणे नैसर्गिक स्वरूपात.