Health Tips: रात्री झोपताना अस्वस्थ वाटतं? शांत झोप लागण्यासाठी करा 'या' गोष्टी
Health Tips: अनेकांना रात्री चांगली झोप लागत नाही, तर अनेकांना रात्री झोपताना अस्वस्थ वाटतं. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही पद्धती अवलंबू शकता.
Feeling restless at night
1/7
शांत झोपेसाठी तुम्ही झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिऊ शकता. दुधात असलेले घटक तुमचं मन शांत करेल. दुधात कॅल्शियम जास्त असतं, त्यामुळे शांत झोप लागते.
2/7
जर तुम्ही चांगल्या झोपेसाठी दूध पित असाल तर त्यात चिमूटभर दालचिनी किंवा वेलची पावडर टाकू शकता. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल.
3/7
झोपण्यापूर्वी एक चमचा मध खाणं चांगले असतं, त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.
4/7
खूप मऊ किंवा खूप कठीण असलेल्या गादीवर आरामात झोपणे कठीण असतं, त्यामुळे झोपण्यासाठी आरामदायी पलंग निवडा.
5/7
रात्री झोपण्यापूर्वी पायाची चांगली मालिश करा, असं केल्याने शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप लागते.
6/7
रात्री उशिरा जेवण करणं टाळा. रात्री उशिरा जेवल्याने देखील अस्वस्थता येते.
7/7
धुम्रपान किंवा मद्यपान यांसारख्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवा, त्यामुळे देखील झोपेत अडथळा निर्माण होतो.
Published at : 10 Jul 2023 07:42 PM (IST)