Health Tips : रात्री उशिरा जेवणं ठरेल घातक; उद्भवतील 'या' समस्या
अपचन आणि वजन वाढणं - रात्री उशिरा जेवल्याने जेवण पचवणं कठीण जातं, त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. रात्री उशिरा जेवण करणं वाढत्या लठ्ठपणाचं एक कारण देखील आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउच्च रक्तदाब - रात्री उशीराने जेवण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम शरीराला होत नाही, त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो आणि उच्च बीपीची समस्या जाणवते.
तणाव - जर तुम्ही उशीरा जेवत असाल तर झोप पूर्ण होत नाही आणि दिवसभर थकवा, तणाव राहतो. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी रात्री लवकर जेवलं पाहिजे.
मधुमेह - रात्रीच्या जेवणानंतर बरेच लोक गोड खातात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. जे नंतर त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे रात्री लवकर जेवण करा आणि फेरफटका मारा.
झोप न येणं - बऱ्याचदा रात्री उशिरा जेवण्याने अन्न फूड पाईपमध्ये येऊ लागतं, यामुळे अस्वस्थता आणि घबराटपणा येतो आणि झोप येत नाही.
चिडचिडेपणा - उशिरा जेवण केल्यास झोपायला देखील उशीर होतो. पुरेशी झोप न झाल्यास हे आपल्या मानसिक आरोग्यास देखील प्रभावित करतं. मेंदूला पुरेसा विश्रांती मिळत नाही, परिणामी चिडचिडेपणा वाढतो.