True cardamom, Weldode : वेलदोडे खा आणि एका रात्रीत चमत्कार पहा; वीर्यापासून ते स्मरणशक्तीपर्यंत, एक वेलदोडे काय काय करत नाही!

True cardamom, Weldode : घरोघरी किचनमध्ये असणाऱ्या वेलदोडेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. उच्च रक्तदाबावरही वेलदोडे गुणकारी आहेत.

Eat Veldode and see miracles in one night

1/10
आरोग्य फिट राहण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. यामध्ये प्रत्येक घरोघरी असलेला छोटासे वेलदोडे सुद्धा अनेक लाभ देऊ शकतो.
2/10
तरुणांसाठी वेलदोडे अत्यंत उपयुक्त आहे. रोज सकाळी एक वेलदोडा खाऊन त्यावर दूध पिल्यानंतर शरीरातील वीर्य वाढण्यास मदत होते. वेलदोडे खाल्ल्याने तोंडाच्या अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.
3/10
ज्यांचे केस गळत आहेत अशांनी वेलदोडे खाऊन त्यावर पाणी पिल्यास केस गळतीसारखी समस्या सुटू शकते.
4/10
झोप येत नसलेल्यांनी झोपताना एक वेलदोडा खाऊन त्यावर एक ग्लास पाणी पिल्यास लगेच झोप येऊ शकते.
5/10
वेलदोडे खाल्ल्याने घशात आणि पोटात होणारी जळजळ कमी होते तसेच पोटातील सूज कमी होते. पित्त आणि पोट साफ न होण्यासारख्या तक्रारी वेलदोडे खाल्ल्याने दूर होतात
6/10
सतत सर्दी असणाऱ्यांच्या घशात खूप वेदना होतात. अशांनी रोजच्या आहारात वेलदोड्याचा वापर करावा. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी एक दोन वेलदोडे खाऊन चावून खा. त्यानंतर कोमट पाणी पिल्यानंतर काही वेळात घसा घशात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळेल.
7/10
वेलदोड्यात रक्तदाबावर ताबा मिळण्याची ताकद आहे. वेलदोड्यात पोटॅशियम आणि फायबर असते. ते रक्तदाबावर नियंत्रण मिळवता रक्तदाब रुग्णांनी जेवणानंतर वेलदोडे खावीत.
8/10
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेलदोडे खाणे गरजेचं आहे. याबरोबर दृष्टी वाढवण्यासाठी सुद्धा वेलदोडे फायदेशीर आहेत. वेलदोड्यांच्या एक दोन दाण्यांमध्ये दोन-तीन चमचे दूध घालून त्याला मिक्सरमध्ये घालून एकजीव करा. यानंतर या मिश्रणात एक ग्लास दूध मिसळून पिल्याने मुलांचे स्मरणशक्ती वाढते.
9/10
वेलदोडे चघळल्यास किंवा वेलदोड्याचा चहा पिल्याने हाॅमोन्समध्ये बदल होऊन तणाव कमी होण्यास मदत मिळते.
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Sponsored Links by Taboola