PHOTO : तुम्हीही रोज परफ्युम लावता का? मग जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
बरेचजण घरातून बाहेर पडताना दिवसभर सुगंधी राहावं म्हणून परफ्युम लावतात. पण काहींना परफ्युमचे एवढे व्यसन असते की, ते सतत सुगंधी राहावे म्हणून अति परफ्युमचा वापरही करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसतत असा परफ्युमच्या वापरण्याचा परिणाम तुमच्या शरीरावर खोलवर होत असतो. परफ्युम वापरणे ही वाईट गोष्ट नसली तरी त्याच्या अतिवापराचे परिणाम तुमच्या त्वचेवर आणि एकूणच आरोग्यावर होत असतात.
दुकानात परफ्युम निवडताना आपण असा सुगंध निवडतो जो तुम्हाला पटकन आवडतो. पण कधी कधी आपण एखादा नवा परफ्युम वापरल्यानंतर अचानक आपल्याला त्रास होऊ लागतो. हा नवा परफ्युम कदाचित तुमच्या रोजच्या सवयीचा नसल्यामुळे आणि त्याचा सुगंध उग्र असल्यामुळे हा त्रास होऊ शकतो असे आपल्याला वाटू लागते. परफ्युमच्या वापरामुळे होणारा हा दुष्परिणाम तुम्हाला ही जाणवू लागला की, तो परफ्युमवापरणे कमी करा. मस्त मोकळ्या हवेत राहा. तुमचा श्वासातून शरीरात गेलेल्या परफ्युमच्या सुगंधाला शरीरातून बाहेर जाण्यासाठी थोडा वेळ द्या म्हणजे तुम्हाला बरे वाटेल.
ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील असते. त्या व्यक्तीला परफ्युमचा त्रास होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. कारण आपल्या शरीरावर अनेक छिद्र असतात तुमच्या घामाचे उत्सर्जनही त्यातून होत असते. तुमच्या छिद्रांमध्ये परफ्युम गेले तर त्यामुळे तुम्हाला पुळया येण्याची शक्यता असते. अशा पुळ्यांमध्ये पू साचतो. अनेकदा तुम्हाला मोठ्या पुळ्या येत नाहीत. पण बारीक पुटकुळ्या येण्याचीही शक्यता असते.
एखादी गोष्ट शरीराला पटली नाही की, आपले शरीर या गोष्टी बाहेर टाकते. परफ्युममध्ये असलेल्या काही घटकांमुळे मळमळण्याचा त्रासही तुम्हाला होऊ शकतो. अस्वस्थपणा आणि मळमळ साधारण तुम्हाला यामध्ये सारखीच वाटू शकते. एखाद्या परफ्युमच्या वासानेही तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो.
परफ्युमच्या अती वापरामुळे अत्यंत सर्वसाधारण आणि पटकन जाणवणारा त्रास म्हणजे डोकेदुखी. एखादे परफ्युम हुंगल्यामुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास पटकन होऊ शकतो. ही डोकेदुखी काही काळासाठी जरी असली तरी त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात.
अनेकांना परफ्युमचा वास घेतल्यामुळे श्वसनासही अडथळा निर्माण होतो. तुमच्या फुफ्फुसांवर परफ्युमचा परिणाम झाल्यामुळे तुम्हाला अस्थमासारखे त्रास होण्याची शक्यता असते.
परफ्युमचे विपरित परिणाम लहान मुलांवर अगदी पटकन होऊ शकता. कारण परफ्युममध्ये असलेले सुंगधी द्रव्ये हे लहान मुलांसाठी मुळीच बनलेले नसतात. त्यामुळे लहान मुलांवर चुकूनही याचा वापर करु नये.
जर तुम्हाला शरीरावर पुरळ येणे, श्वसनाशी संबंधित त्रास किंवा सतत डोके दुखीचा त्रास होत असेल तर हा त्रास तुम्हाला तुमच्या परफ्युममुळे तर होत नाहीना याची खात्री करून घेऊन तुम्ही वापरत असलेल्या परफ्युमचा वापर वेळेत कमी करा .