Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
मधुमेहामध्ये काळे चणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. याच्या मदतीने तुम्ही मधुमेहाची पातळी नियंत्रित करू शकता. तसेच मधुमेहादरम्यान होणारा लठ्ठपणाही आटोक्यात ठेवता येतो. जाणून घेऊया मधुमेहामध्ये काळे चणे खाण्याचे काय फायदे आहेत? (Photo - Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाळ्या चण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. (Photo - Pixabay)
काळ्या चण्यात विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर आढळून येतात. याचा फायदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. (Photo - Pixabay)
काळ्या चण्यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असते. याचा फायदा मधुमेही रुग्णांना होतो. त्याशिवाय, रक्तदाबालाही नियंत्रित केले जाऊ शकते. (Photo - Pixabay)
मधुमेहाच्या दरम्यान, वाढत जाणाऱ्या लठ्ठपणाला नियंत्रित करण्यासाठी काळे चणे खावेत (Photo - Pixabay)
मधुमेहाच्या दरम्यान वाढत जाणारे कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराच्या आजाराला नियंत्रित ठेवले जाते. (Photo - Pixabay)
काळे चणे भाजून खावेत. अधिक प्रमाणात मसाले घातलेले काळे चणे खाऊ नये. अन्यथा फायद्यांऐवजी नुकसान अधिक होईल. (Photo - Freepik)