Best Lunch Time : जेवण करण्याची योग्य वेळ कोणती; जाणून घ्या सविस्तर माहिती
जगभरातल्या लोकांचे पुन्हा आयुर्वेद, हर्बल आणि ऑर्गेनिक उत्पादनांकडे लक्ष वाढते आहे. अनेक लोक केमिकलयुक्त पदार्थांपासून दूर राहत आहेत.(Photo Credit : Pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हला माहितीच असेल चुकीच्या वेळी सकाळचा (Morning) नाश्ता केल्याने तसेच जेवल्याने मिळणारे पौष्टिक घटक हे शरीरासाठी (Body) नुकसानदायक ठरू शकतात. (Photo Credit : Pexels)
तसेच चुकीच्या वेळेत जेवण केल्यास वात, पित्त आणि कफावर परिणाम होऊन त्यांचे संतुलन बिघडल्याने तुम्ही आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.(Photo Credit : Pexels)
प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आर्युवेदानुसार नाश्ता, जेवणाची योग्य वेळ जाणून त्याप्रमाणे खाण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या शरीरासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल.(Photo Credit : Pexels)
आयुर्वेदानुसार (Ayurveda) सकाळी ७ ते ८ दरम्यानची वेळ नाश्त्यासाठी अतिशय असल्याचे सांगण्यात आले आहे. (Photo Credit : Pexels)
उठल्यानंतर लगेच एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर फ्रेश व्हा.(Photo Credit : Pexels)
असे केल्याने तुमचे पोट साफ होईल तसेच चेहऱ्याची चमक वाढेल. सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासाने काहीतरी खाल्ले पाहिजे. जास्त वेळ न खाल्याशिवाय राहिलात तर तुम्हाला गॅसेस होऊ शकतात.(Photo Credit : Pexels)
दुपारी १२ ते २.३० दरम्यान जेवावे. सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यादरम्यान ४ तासांचे अंतर हवे. सूर्यास्तानंतर अन्न खाऊ नये, कारण त्यामुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतात. (Photo Credit : Pexels)
संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान रात्रीचे जेवण जेवावे. तसेच आयुर्वेदानुसार झोपण्याआधी तीन तास तुम्ही जेवले पाहिजे. त्यामुळे शरीरात जेवण चांगले पचते. तसेच रात्री ९ नंतर जेवल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.(Photo Credit : Pexels)
तुम्हला जर निरोगी आणि उत्तम आरोग्य हवे असेल तर तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळेकडे लक्ष द्यायला हवे. (Photo Credit : Pexels)