Health Tips : चहासोबत खाऊ नका 'हे' पदार्थ;आरोग्यावर होईल वाईट परिणाम
जगभरात करोडो चहा प्रेमी आहेत. चहा हे असे पेय आहे, ज्याशिवाय अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्लॅक टी, ग्रीन टी, हर्बल टी असे चहाचे अनेक प्रकार आहेत.
अनेक जण दिवसातून दोन-तीन कप चहा पितात.
आम्लयुक्त खाद्यपदार्थ म्हणजेच अॅसिडिट फूड चहासोबत खाऊ नयेत. कारण ते खाल्ल्याने शरीराला चहामध्ये आढळणारे कॅटेचिन (अँटीऑक्सिडंट्स) शोषून घेणे कठीण होते.
केक, चॉकलेट, बिस्किटे यांसारख्या गोड पदार्थही चहासोबत टाळावेत.
चहासोबत मसालेदार पादर्थ खाणं टाळावं. लसूण, कांदा, कढीपत्ता आणि मिरची यांचा वापर करुन तयार करण्यात आलेले पदार्थ चहासोबत खाणे टाळा.
तळलेले पदार्थ पचायला जड असतात. हे खाल्ल्याने तुम्हाला सुस्तपणा जाणवू शकतो.त्यामुळे कांदा भजी, पुऱ्या यांसारख्ये तळलेल्या पदार्थांचे सेवन चहासोबत करणे टाळा.
रोज दोन कप चहा प्यावा. त्यापेक्षा जास्त चहा प्यायल्यानं अॅसिडीटीचा त्रास जाणवू शकतो.