Guava Leaves Benefits : फक्त पेरूच नाही तर पानांमध्येही आहेत अनेक गुणधर्म
Guava Leaves Benefits : पेरू आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी मानला जातो
Guava Leaves Benefits
1/9
पेरू आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी मानला जातो, पण तुम्ही कधी पेरूच्या पानांपासून तयार केलेले रस प्यायला आहे का? जर नसेल तर त्याचे फायदे जाणून तुम्ही नक्कीच याचे सेवन कराल.
2/9
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यापासून ते अॅलर्जीची समस्या दूर करू शकते. याशिवाय पेरूची पाने उकळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
3/9
पेरूची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय आरोग्यदायी असतात. यामध्ये असलेले फिनोलिक तत्व रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे.
4/9
मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर पेरूची पाने उकळून रोज प्या. याचा तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल.
5/9
पेरूच्या पानांमध्ये अँटी-एलर्जिक गुणधर्म असतात, जे ऍलर्जीच्या समस्येपासून मुक्त होण्यास प्रभावी ठरतात. जर तुम्हाला ऍलर्जीपासून मुक्ती मिळवायची असेल तर नियमितपणे पेरूच्या पानांचा रस प्या.
6/9
पेरूच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.
7/9
जर तुम्हाला गॅस्ट्रिक अल्सरचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात पेरूच्या पानांचा रस प्या.
8/9
यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होईल. यासोबतच पोटातील अल्सरपासूनही सुटका मिळेल.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 07 Oct 2022 05:15 PM (IST)