Benefits Of Groundnut: अंडी नाही, काजू नाही... 'शेंगदाणेच' आहेत प्रोटीन पॉवरहाऊस!

Benefits Of Groundnut : शाकाहारी लोकांसाठी शेंगदाणे हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे आणि हे स्नायू (मसल्स) बनवण्यास मदत करते, वाचा पूर्ण बातमी..

Continues below advertisement

Benefits Of Groundnut

Continues below advertisement
1/11
शेंगदाण्यामध्ये अंडी आणि काजूपेक्षाही जास्त प्रथिने (प्रोटीन) असतात.
2/11
शेंगदाणे एक स्वस्त, चविष्ट आणि पौष्टिक 'सुपरफूड' आहे.
3/11
हे केवळ तुमची ऊर्जा वाढवत नाही, तर हृदय, मेंदू, त्वचा आणि केसांनाही निरोगी ठेवते.
4/11
दररोज २५-३० ग्रॅम शेंगदाणे म्हणजेच मूठभर शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी योग्य असते.
5/11
१०० ग्रॅम शेंगदाण्यामध्ये अंदाजे २५-२६ ग्रॅम प्रथिने असतात.
Continues below advertisement
6/11
शाकाहारी लोकांसाठी शेंगदाणे हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे आणि हे स्नायू (मसल्स) बनवण्यास मदत करते.
7/11
शेंगदाण्यातील 'मोनोअनसॅचुरेटेड' आणि 'पॉलीअनसॅचुरेटेड' फॅटी ऍसिडस् खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.
8/11
यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका कमी होतो.
9/11
शेंगदाण्यातील फायबर आणि प्रथिने पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
10/11
शेंगदाण्यातील नियासिन आणि व्हिटॅमिन B3 मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून बचाव करतात.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola