Apple Benefits : हिरवे की लाल सफरचंद? तुमच्यासाठी कोणते आहे फायदेशीर?
Apple Benefits : हिरव्या सफरचंदांमध्ये लाल सफरचंदांपेक्षा जास्त फायबर असते.
Apple
1/10
रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर रहा. असे नेहमीच म्हटले जाते. या म्हणीचा अर्थ असा आहे की, रोज एक सफरचंद खाल्ल्यास आजारांपासून दूर राहतात.
2/10
याचे कारण म्हणजे सफरचंदात अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. पण, लाल आणि हिरव्या सफरचंदांमध्ये नेमका काय फरक? याबाबत कधी विचार केला आहे का?
3/10
आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिरवे सफरचंद चवीला आंबट असतात आणि त्यांची साल जाड असते.
4/10
तर लाल सफरचंद गोड-रसरशीत आणि पातळ सालीची असतात. लोकांना हिरव्या सफरचंदापेक्षा लाल सफरचंद खायला जास्त आवडते.
5/10
दोन्ही सफरचंदांचे वेगवेगळे फायदे आहेत. हिरव्या सफरचंदांमध्ये लाल सफरचंदांपेक्षा जास्त फायबर असते. त्यात कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाणही लाल सफरचंदापेक्षा कमी असते. हिरवे सफरचंद मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम आहे.
6/10
त्याच लाल सफरचंदात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यास आणि शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून रोखण्यास मदत करतात.
7/10
दोन्ही सफरचंदांच्या पोषणात थोडासा फरक असल्याने दोन्ही सफरचंद शरीरासाठी आरोग्यदायी आहेत.
8/10
हिरव्या सफरचंदात व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे दृष्टी वाढते, मुरुमांचा धोका कमी होतो आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
9/10
लाल सफरचंदात भरपूर पोषक तत्व असतात जे शरीराला अनेक फायदे देतात. त्यामुळे दोन्ही सफरचंद शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 29 Nov 2022 08:12 PM (IST)