Facts: माणसाच्या डोक्यावर किती केस असतात? जाणून घ्यायचं असेल तर 'हे' आहे योग्य उत्तर

पुढील स्लाइड्समध्ये तुम्हाला समजेल, मानवी शरीरावर किती केस असतात. तसे, प्रत्येक व्यक्तीनुसार केसांची संख्या भिन्न असते. काही लोकांच्या डोक्यावर जास्त केस असतात, तर काही लोकांच्या डोक्यावरील केसांची संख्या फारच कमी असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रत्येकाच्या शरीरानुसार प्रत्येकाच्या केसांची घनता वेगवेगळी असते. हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, प्रति चौरस सेंटीमीटरमध्ये बोलायचं झालं तर डोक्यावर 124 ते 200 केस असतात.

यानुसार अंदाज काढला, तर मानवी शरीरावर सरासरी एक लाख ते दीड लाख केस असतात. पण ही संख्या व्यक्तीपरत्वे बदलते.
मानवी डोक्याच्या केसांची वाढ दरवर्षी 6 इंचापर्यंत होते आणि ती दर महिन्याला अर्धा इंच इतकी असते.
तसेच पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये केसांची वाढ कमी होते आणि केस तुटण्याचे प्रमाण अधिक असते.
प्रत्येक दिवसाला किमान 50 केस तुटतात किंवा गळतात.