PHOTO: रात्री झोप येत नाही? झोपेच्या त्रासापासून त्रस्त आहात? 'हे' उपाय करून पहा!

झोप हा रोजचा महत्वाचा दिनक्रम.रात्रीची झोप झाली नाही तर पुढचा पुर्ण दिवसभरआळस जाणवतो.शांत झोपण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.तर मग ह्या टीप्स रात्रीच्या शांत झोपेसाठी उपयोगी ठरतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जायफळाचे सेवन: रात्री झोपताना दुधासोबत जायफळ पूड एकत्र करुन घेतल्याने लवकर झोप लागते. मात्र जायफळाचे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

तळपायाला तेल लावणे : पायाच्या तळव्यावर झोपण्यापूर्वी मोहरीचे तेल लावल्याने ही शांत झोप लागण्यास मदत होते.
झोपण्यापूर्वी फ्रेश होणे: दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चेहरा,हात,पाय स्वच्छ धुणे यामुळे शांत झोप लागते. गरम पाण्याने अंघोळ केल्यास सुद्धा झोप शांत लागते.
दूध पिणे: रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिण्याने चांगली झोप लागते. रात्री केशर किंवा हळद घालून दूध पिणे आरोग्यास फायदेशीर ठरते.
संगीत ऐकणे: झोप येत नसेल तर शांत आणि मंद संगीत ऐका जे तुमच्या मेंदूला आणि विचारांना शांतता प्रदान करेल.
पुस्तक वाचणे: अनेकदा अति विचार आणि नकारात्मक विचार झोप न येण्याचे कारण असते.अशा वेळेस रात्री झोपताना सकारात्मक पुस्तके वाचली तर तुमचे विचार सकारात्मक होऊन शांत झोप लागते
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पाहणे बंद करा: झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल, टिव्ही, संगणक आदी पाहणे बंद करा जेणेकरून झोप लागेल.
हलका आहार घ्या: शरीरात अन्नाचे पचन होण्यासाठी रात्री हलका आहार घ्या. मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.