Kojagiri Paurnima: जाणून घ्या मसाला दूध बनवण्याची सोपी पद्धत!

आपणही कोजागिरी पौर्णिमा हा शब्द ऐकला की, आपल्यालाही पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे मसाला दूध. जाणून घ्या मसाला दूधचं बनवण्याची सोपी पद्धत!

milk

1/10
मसाला दुध बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध- 1 लीटर, साखर - 5 चमचे, बदाम/ सुकामेवा- 1/2 वाटी, वेलची पूड 1 लहान चमचा, केशर - 10 ते 12 पाकळ्या.
2/10
मसाला दूध बनवण्यासाठी बदाम एक तासापूर्वी भिजत घाला. नंतर त्याचे साल काढून घ्या.
3/10
त्याचप्रमाणे एका वाटीत कोमट दुधात केशर घालून ठेवा.
4/10
आता दूध मंद आचेवर उकळू द्या.
5/10
त्यासोबतच इतर सुकामेवा म्हणजेच पिस्ता, काजू यांनाही बारीक चिरून घ्या.
6/10
सगळा सुकामेवा एकत्र करून ठेवा, व बदाम थोड्याश्या दुधात वाटून घ्या. गरम होत असलेल्या दुधात ही बदामाची पेस्ट मिसळा.
7/10
त्यातच केसर सुद्धा मिक्स करा. त्याने दुधाचा रंग लेगच बदलेल. त्याचसोबत चवीप्रमाणे साखर मिसळा.
8/10
आता तुम्ही दुधात वेलची पूड आणि सुका मेवे टाकून दूध गार्निश करु शकता.
9/10
शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा, यासाठी चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून नंतर याचं सेवन केलं जातं.
10/10
आयुर्वेदानुसार, चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चंद्रप्रकाशात दूध प्यायल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते.
Sponsored Links by Taboola