Lemon Grass: घरीच मिळवा स्पा सारखी चमक; जाणून घ्या गवती चहाचे फायदे!
लेमनग्रासमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करतात.
गवती चहा
1/10
लेमनग्रास (गवती चहा) ही त्वचेसाठी अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती आहे.
2/10
त्वचा स्वच्छ, उजळ आणि निरोगी ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
3/10
खास करून तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम उपाय ठरतो.
4/10
लेमनग्रासमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करतात.
5/10
लेमनग्रासच्या अर्काचा किंवा टोनरचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स, अॅक्ने आणि ब्लॅकहेड्स कमी होतात.
6/10
लेमनग्रासमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि त्वचा उजळ, तजेलदार आणि टवटवीत दिसते.
7/10
लेमनग्रासचा वास व त्याचे थंडसर गुणधर्म त्वचेला ताजेतवाने करतात आणि तणावही कमी करतात.
8/10
लेमनग्रासचा उपयोग कसा करावा? लेमनग्रास चहा बनवून गार करून टोनर म्हणून वापरा.
9/10
लेमनग्रासचं आवश्यकतेनुसार तेल पाण्यात मिसळून फेशियल स्टीम घ्या.
10/10
नियमित वापर केल्यास नैसर्गिकरित्या त्वचेची चमक वाढवण्यास नक्कीच मदत होते! (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 19 Jun 2025 04:05 PM (IST)