Face Wash: वारंवार चेहरा धुण्याची सवय योग की अयोग्य?
सूर्यप्रकाश, उष्णता आणि घाम यामुळे त्वचेवर अनेक समस्या निर्माण होतात. यामुळेच उन्हाळ्यात लोक वारंवार चेहरा धुतात.(Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा तुम्ही उठता तेव्हा प्रथम चेहरा धुवा, यामुळे आळस तर दूर होतोच पण तुमच्या शरीराला लगेच ताजेतवाने वाटते. सकाळी चेहरा धुतल्याने छिद्र साफ होतात. लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा चेहरा सामान्य पाण्याने सौम्य फेसवॉशने धुवा.(Photo credit: Unsplash)
जर तुमच्या त्वचेचा प्रकार तेलकट असेल तर तुम्ही दुपारी सुद्धा एकदा चेहरा धुवू शकता. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार साबण किंवा फेसवॉशचा वापर करावा. (Photo credit: Unsplash)
सकाळी चेहरा धुतल्यानंतर तेलकट त्वचेच्या लोकांच्या चेहऱ्यावर दुपारपर्यंत तेल जमा होऊ लागते. त्यामुळे असे लोक दुपारीही थंड पाण्याने किंवा फेसवॉशने चेहरा स्वच्छ करू शकतात.(Photo credit: Unsplash)
जेव्हाही तुम्ही कामावरून परतता तेव्हा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो. चेहऱ्यावर साचलेली घाणही साफ होते. (Photo credit: Unsplash)
काही लोक उन्हाळ्यात संध्याकाळी अंघोळही करतात. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर एकदा तरी तुमचा चेहरा पूर्णपणे धुवा.(Photo credit: Unsplash)
आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा. विशेषत: गाजर, काकडी, पपई, डाळिंब, कोरफड यासारख्या गोष्टींचे सेवन केल्यास चेहरा निरोगी राहील.(Photo credit: Unsplash)
जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझेशन राहील.(Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही(Photo credit: Unsplash)