Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Skin Care Tips : चेहऱ्याच्या सर्व समस्यांचे एकमेव सोल्युशन 'फेस रोलर' त्वचा होईल चमकदार
चेहरा चांगला बनवण्याकरता अनेकजण विविध प्रोडक्ट्स वापरत असतात.मात्र कित्येकदा केमिकलयुक्त प्रोडक्ट्समुळे चेहऱ्याचे मोठे नुकसान होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेहऱ्याची चमक तु्म्हाला वाढवायची असल्यास तु्म्ही एकदा तरी फेस रोलर वापरणे गरजेचे आहे. फेस रोलर चेहऱ्याकरता वापरणे तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरू शकते.
फेस रोलर एक ब्यूटी टूल आहे. ज्याचे अनेक फायदे चेहऱ्याला होतात. बाजारात अनेक प्रकारचे फेस रोलर मिळतात. याचा उपयोग त्वचा. मान, कपाळ यांची मसाज करण्याकरता केला जातो.यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो.
याचा नियमीत वापर केल्यास रक्त प्रवाह चांगला होतो. तर पिंपल्स , मुरूम अशा समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
तुमच्या चेहऱ्यावर वारंवार सुज येत असेल तर तुम्ही फेस रोलरचा वापर करू शकता.
तसेच चेहरा हेल्थी आणि ग्लोइंग बनण्यास मदत होते.
तर नियमीत याचा वापर केल्यास त्वचा चांगली बनते आणि चेहऱ्यावरील फाईन लाईन्स कमी होतात.
रात्रीच्या वेळी फेस रोलरचा वापर केल्यास चेहऱ्याच्या मांसपेशींना मोठा फायदा होतो. चेहऱ्यावर असणारे डाग कमी होतात.
खूप जास्त दाबून याने मसाज करू नये.
सकाळी किंवा रात्री 4-5 मिनीट याने तुम्ही चेहऱ्याला मसाज करू शकता.