Multani Mati : मुलतानी मातीचा अति वापर ठरू शकतो चेहऱ्यासाठी घातक
ज्यांची स्किन खूप तेलकट आहे. ते लोक मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावतात. पण अशा वेळी ऋतू पाहून मगच हा लेप चेहऱ्याला लावावा. हिवाळ्यात लोक मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावू नये. हिवाळ्यात या लेपने तुमची स्किन कोरडी पडू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरडी त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी माती लावण्याआधी त्यात अॅलोवेरा जेल , बदामाचे तेल किंवा मध मिक्स करावा. फक्त मुलतानी माती चेहऱ्याला लावल्यास तुमची त्वचा कोरडी पडते आणि वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.
तुमची त्वचा नाजुक असल्यास मुलतानी मातीचा वापर करणे बंद करावे. नाजुक त्वचेवर मुलतानी मातीचा लेप लावल्यास चेहऱ्यावर इनफेक्शन होऊ शकते.
मुलतानी मातीचा वापर करणे बंद करावे. याच्या वापराने चेहरा काळा पडू शकतो.
. जर तुम्हाला कायम सर्दी , खोकला असेल तर मुलतानी माती वापरू नये. थंड असलेल्या मुलतानी मातीच्या वापरामुळे सर्दी , खोकला वाढण्याची शक्यता असते.
मुलतानी माती रोज चेहऱ्याला लावणे टाळावे.
मुलतानी मातीचा योग्य प्रमाणात वापर केला नाही तर चेहऱ्यावरील पिगमेंटेशन वाढते.