Sugar : जास्त साखर खाल्ल्याने शरीरात काय परिणाम होतात? जाणून घ्या!
जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग सारख्या गंभीर समस्या होतात.
sugar:(pic credit:unsplash)
1/9
शरीरात सूज येणे, दातांना कीड लागणे, त्वचेवर पुरळ येणे आणि थकवा जाणवणे ही तात्काळ होणारी लक्षणे आहेत, तर दीर्घकाळात आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
2/9
साखरेमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि ती खाण्याची तीव्र इच्छा निर्माण करते, ज्यामुळे वजन वाढते आणि लठ्ठपणा येतो.
3/9
जास्त साखर खाल्ल्याने शरीरात इन्सुलिन प्रतिरोधवाढतो, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
4/9
साखरेचं जास्त सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढतो.
5/9
आहारात जास्त साखर असल्यास शरीरात सूज वाढते, जी दीर्घकाळात अनेक जुनाट आजारांना आमंत्रण देऊ शकते.
6/9
साखर आणि झोप यांचा थेट संबंध आहे. जास्त साखर खाल्ल्याने झोपेच्या गुणवत्तेत घट होते.
7/9
जास्त साखर खाल्ल्यामुळे शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे त्वचेतील तेल ग्रंथी जास्त तेल तयार करतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.
8/9
साखरेच्या अतिरिक्त सेवनाने दातांना कीड लागण्याचा धोका वाढतो.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 03 Oct 2025 02:03 PM (IST)