Risks of Drinking Too Much Water : अति पाणी पिणं आरोग्यासाठी घातक? जाणून घ्या जास्त पाणी पिण्याचे 5 धोके
Risks of Drinking Too Much Water : पाणी आवश्यक असलं तरी त्याचं अति सेवन शरीरासाठी घातक ठरू शकतं, त्यामुळे तहान लागल्यावर आणि गरजेनुसारच पाणी प्यावं.
Continues below advertisement
Risks of Drinking Too Much Water
Continues below advertisement
1/11
पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण पाण्यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड राहतं तसेच, यामुळे शरीराचं तापमानही व्यवस्थित ठेवण्यास मदत होते.
2/11
अनेकदा डॉक्टरांकडून आपल्याला दिवसातून आठ ग्लास पाणी प्यायला सांगितलं जातं. पण, तुम्हाला माहीत आहे का जास्त पाणी पिणं धोकादायक ठरू शकतं.
3/11
जर आपण एकाच वेळी खूप पाणी प्यायलो, तर आपल्या शरीरातील सोडियम नावाचा महत्त्वाचा घटक कमी होऊ शकतो.
4/11
सोडियम कमी झाल्यास पेशी फुगतात आणि मेंदूवर ताण येऊ शकतो. याला वॉटर टॉक्सिसिटी किंवा हायपोनेट्रेमिया म्हणतात.
5/11
जर आपली लघवी सतत रंगहीन आणि खूप जास्त येत असेल, तर याचा अर्थ शरीरात पाणी जास्त प्रमाणात आहे. यामुळे मळमळ, उलटी, चक्कर यांसारख्या समस्या निर्माण होतात.
Continues below advertisement
6/11
मेंदू सुजल्यामुळे डोकं दुखणं, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, चिडचिड किंवा थकवा जाणवू शकतो. हात, पाय, चेहरा सूजू शकतो आणि त्वचा कोरडी दिसू शकते.
7/11
जास्त पाणी प्यायल्यास मूत्रपिंडांना अधिक काम करावं लागतं. ज्यामुळे शरीर थकलेले वाटू शकते. इलेक्ट्रोलाईट्स कमी झाल्यामुळे स्नायू दुखू लागतात.
8/11
अत्यंत गंभीर प्रकरणात सोडियमची पातळी खूप कमी होऊन झटके येणं, बेशुद्ध होणं किंवा श्वास घेण्यास त्रास देखील होऊ शकतो.
9/11
वय, शरीराचा आकार, कामाचा प्रकार आणि हवामान यावरून पाण्याची गरज वेगवेगळी असते. सामान्यत प्रौढ महिलांनी 2.7 लिटर आणि पुरुषांनी 3.7 लिटर पाणी दररोज प्यावे.
10/11
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तहान लागल्यावरच पाणी प्यावे. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी घातकच ठरतं.
11/11
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही)
Published at : 08 Nov 2025 02:35 PM (IST)