Side Effects of Soft Drinks : डाएट सोडा पिताय? मेंदूसाठी ठरू शकतं घातक!
Side Effects of Soft Drinks : आरोग्य राखण्यासाठी डाएट सोड्यासारख्या कृत्रिम पेयांपासून दूर राहणे योग्य ठरू शकतं.
Continues below advertisement
Soft Drinks
Continues below advertisement
1/11
आजकाल लोक आरोग्याबद्दल जागरूक होत असले तरी पूर्ण जागरूकतेचा अभाव दिसून येतो. सॉफ्ट ड्रिंकमध्ये साखर असते हे माहिती असूनही अनेक जण डाएट सोडा सुरक्षित मानतात.
2/11
डाएट सोडाला शून्य कॅलरी आणि शून्य साखर असे म्हणून बाजारात विकले जातात. अनेकांना वाटतं की डाएट सोडा हा साखरेच्या सोड्यापेक्षा चांगला पर्याय आहे.
3/11
पण डाएट सोडा पिण्याचे तोटे फार कमी जणांना माहिती असतात. या पेयामध्ये वापरलेले कृत्रिम स्वीटनर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
4/11
डाएट सोडातील कॅफीन आणि प्रिझर्व्हेटिव्ह मेंदूवर नकारात्मक परिणाम करू शकतात. अशा प्रकारच्या घटकांमुळे हार्मोन संतुलन बिघडण्याची शक्यता वाढते.
5/11
डाएट सोडा नियमित पिणाऱ्यांच्या न्यूरल अक्टिव्हिटीमध्ये बदल दिसू शकतात. हे पेय आपल्या मज्जासंस्थेला सतत ताणात ठेवू शकते.
Continues below advertisement
6/11
कृत्रिम स्वीटनरचे जास्त प्रमाणात सेवन न्यूरोट्रान्समीटरवर थेट प्रभाव टाकते. डोपामिन आणि सेरोटोनिनचे नैसर्गिक संतुलन त्यामुळे बिघडू शकतं.
7/11
या बदलांमुळे मनःस्थिती सतत बदलणे किंवा चिडचिडेपणा आणि अस्वस्थता देखील वाढू शकतं.
8/11
डाएट सोडा पिणाऱ्यांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. दीर्घकाळ हे पेय घेतल्यास स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता वाढते.
9/11
तज्ज्ञांच्या मते, डाएट सोडा मेंदूची कार्यक्षमता कमकुवत करू शकतात. या पेयातील घटक मेंदूच्या पेशींवर नकारात्मक परिणाम करतात.
10/11
शरीराला मिळणाऱ्या चुकीच्या सिग्नलमुळे मेंदूचा रसायनशास्त्रीय समतोल ढासळू शकतो. आरोग्य राखण्यासाठी डाएट सोड्यासारख्या कृत्रिम पेयांपासून दूर राहणे योग्य ठरू शकतं.
11/11
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 21 Nov 2025 02:05 PM (IST)