Dream Interpretation : स्वप्नामध्ये पैसे दिसतात? धनलाभ की अशुभ संकेत? जाणून घ्या
स्वप्नामध्ये पैसे दिसणं शुभ की अशुभ हे तुम्हाला पैसे कशा परिस्थितीमध्ये आणि कोणत्या प्रकारे दिसले, यावर अवलंबून असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्हाला स्वप्नामध्ये कोऱ्या, करकरीत नोटा दिसल्या तर, याचा अर्थ हा शुभ संकेत आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असून तुम्हाला धनलाभ होईल आणि पैशाची चिंता मिटेल, असा होतो.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये पैशाची नाणी आणि नाण्यांचा खणखण आवाज ऐकू आला तर हे मात्र, अशुभ मानले जाते.
स्वप्नामध्ये पैशांची नाणी दिसणाऱ्या व्यक्तीला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे अशा वेळी व्यक्तींनी सावधगिरी बाळगत खर्च कमी करणे, गरजेचे आहे.
स्वप्न शास्त्रानुसार, तुम्ही बँक अकाऊंटमध्ये पैसे भरत आहात, असं स्वप्न तुम्हाला दिसलं तर, हा शुभ संकेत मानला जातो. तुम्हाला लवकरच धनलाभ होईल असा या स्वप्नाचा अर्थ असल्याचं मानलं जातं.
स्वप्नामध्ये जर तुम्हाला फाटलेली नोट दिसली किंवा तुमचे पैसे हरवल्याचं स्वप्न पडलं तर, हे अशुभ मानलं जातं.
स्वप्न शास्त्रानुसार, तुमचे बनणारे आर्थिक काम बिघडू शकतो, असा या स्वप्नाचा अर्थ आहे. त्यामुळे देवाणघेवाण आणि गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा.
जमिनीवरील पैसे उचलत आहे, असे स्वप्न जर एखाद्या व्यक्तीला पडले तर, त्याला अर्थ हे तुमचं आर्थिक नुकसान होण्याचे संकेत आहे. त्यामुळे व्यवहार करताना काळजीपूर्वक करा.
एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये हवेमध्ये पैसे उडताना किंवा पैशांचा पाऊस पडताना दिसलं तर, याचा अर्थ तुमचा आर्थिक व्यवहार योग्यप्रकारे सुरु आहे आणि तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.