Mutton : मटण खाल्ल्यानंतर 'या' 6 चुका करू नका!

मटण खाल्ल्यानंतर हलके, पचायला सोपे असे अन्न खा आणि मध, दूध, चहा, मसाले, पनीर, थंड पाणी टाळा. ही सोपी काळजी तुमचे पचन सुधारेल आणि शरीर निरोगी राहील.

Continues below advertisement

Mutton

Continues below advertisement
1/10
जर तुम्ही मटण खाल्ल्यानंतर मध खाल्लं तर तुमच्या हृदय आणि किडनीवर ताण पडू शकतो. त्यामुळे मध सेवन टाळल्यास शरीरास आराम मिळतो.
2/10
मटणाबरोबर दूध, दही, चीज यासारखे पदार्थ तुमच्या पचनावर परिणाम करू शकतं आणि पचनास त्रास होऊ शकतं.
3/10
मटण खाल्ल्यानंतर जर तुम्ही गरम पेये जसे की चहा किंवा कॉफी पियालात तर पचनात गॅस निर्माण करू शकते आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो.
4/10
खूप मसालेदार किंवा तिखट पदार्थ तुमच्या पचनावर ताण आणू शकतात. त्यामुळे मटणानंतर हलक्या आणि सौम्य मसाल्याचा आहार घ्या.
5/10
मटण खाल्ल्यानंतर पनीर आणि आंबट फळं एकत्र खाल्ल्यास पचनात अडथळा येतो. यामुळे तुम्हाला अपचन, गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते.
Continues below advertisement
6/10
मटण खाल्ल्यानंतर थंड पाणी, कोल्डड्रिंक किंवा बर्फाचा वापर पचनावर विपरीत परिणाम करू शकतो. त्याऐवजी सामान्य तापमानाचे पाणी प्यावे.
7/10
मटण खाल्ल्यानंतर पचायला सोपे अन्न जसे की भाकरी, भात, हलकी भाजी खाल्यास तुमच्या शरीराला आराम मिळेल आणि पचन सुधारू शकतं.
8/10
मटण खाल्यानंतर शरीरावर जास्त ताण पडू नये म्हणून तुम्ही काही वेळ आराम करा, हलकी चाल करा किंवा विश्रांती घ्या.
9/10
मोठ्या प्रमाणात मटण एकाच वेळेस खाल्ल्यास पचनावर ताण येतो. त्यामुळे मोजके प्रमाणात मटण खा.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola