Caffeine health : हिवाळ्यात दुधाची कॉफी खरंच खोकला वाढवते? याचे फायदे जाणून व्हाल थक्क...
Caffeine health : तज्ञांच्या मते दुधाची कॉफी खोकला वाढवत नाही, पण ऍसिडिटी, निद्रानाश, उच्च रक्तदाब किंवा गर्भधारणा असलेल्या व्यक्तींनी कॅफिनमुळे त्रास वाढू शकतो म्हणून ती काळजीपूर्वक सेवन करावी.
Continues below advertisement
Caffeine health
Continues below advertisement
1/9
हिवाळा सुरू झाला की लोक गरम पेयांचा आस्वाद घेतात, आणि त्यात दुधाची कॉफी विशेषत लोकप्रिय ठरते कारण ती शरीराला उबदारपणा देऊन मनाला आराम देते.
2/9
अनेकांना वाटते की दुधाची कॉफी खोकला वाढवते, पण तज्ञ सांगतात की हे फक्त एक गैरसमज आहे आणि सामान्य व्यक्तीमध्ये ती खोकला वाढवत नाही.
3/9
डॉक्टरांच्या मते, एखाद्या व्यक्तीला दूध किंवा कॉफीची ऍलर्जी नसेल तर दुधाची कॉफी पिल्याने खोकल्यात वाढ होत नाही.
4/9
कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देतात, मानसिक एकाग्रता वाढवतात आणि दिवसभर सतर्क राहण्यास मदत करतात.
5/9
मात्र ज्यांना आधीच ऍसिडिटी, गॅस, पोटदुखी किंवा अल्सरचे त्रास असतात, त्यांनी कॉफीचे सेवन काळजीपूर्वक करावे कारण कॅफिन त्यांच्या समस्यांमध्ये वाढ करू शकते.
Continues below advertisement
6/9
कॅफिन मेंदूला उत्तेजित करून झोपेची प्रक्रिया बिघडवू शकते, त्यामुळे झोपेच्या तक्रारी असलेल्या लोकांनी विशेषत संध्याकाळी आणि रात्री कॉफी टाळणे आवश्यक आहे.
7/9
उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींमध्ये कॅफिनमुळे बीपी तात्पुरता वाढण्याची शक्यता असल्याने, अशांनी डॉक्टरांशी चर्चा करूनच कॉफीचे सेवन करावे.
8/9
गर्भधारणेदरम्यान कॉफी शरीरावर गरम परिणाम देते आणि जास्त प्रमाणात घेतल्यास गर्भपात किंवा बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ती मर्यादित पिणेच सुरक्षित मानले जाते.
9/9
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 19 Nov 2025 01:26 PM (IST)