काय सांगता? हा मासा करतो डायबेटिस आणि बीपी कंट्रोल; जाणून घ्या!

माशांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे,अमिनो ॲसिड असतात जे ऊर्जा, विकास आणि ताकद देतात. काही मासे चविष्ट तर असतातच पण औषधांपेक्षा जास्त आरोग्यदायी असल्याने डॉक्टरही मासे खाण्याचा सल्ला देतात.

Health Fish Tips

1/10
आज घरी स्वयंपाकात माश्यांचा बेत आहे, हे ऐकताच भूक लागते. ते चविष्ट तर आहेतच, पण आरोग्यासाठीही सर्वोत्तम मानले जातात. डॉक्टरही आहारात माशांचा समावेश करायला सांगतात, कारण काही मासे औषधांपेक्षा जास्त परिणामकारक ठरतात.
2/10
पण वैज्ञानिक अभ्यासानुसार हे मासे जटिल आजारांपासून बचाव करू शकतात, असं सिद्ध झालं आहे.
3/10
वैज्ञानिक अभ्यासानुसार एक विशेष सागरी मासा मधुमेह, बीपी आणि यकृताच्या तक्रारींसारख्या गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवण्यात मदत करतो. चवीतही तो हिलसा आणि पारसा सारख्या लोकप्रिय माशांपेक्षा चविष्ट ठरतो.
4/10
हा मासा म्हणजेच 'धन्वंतरी' मासा. सागरी असूनही त्याची मागणी झपाट्याने वाढतेय आणि त्यामागचं कारण म्हणजे त्याचे विलक्षण आरोग्यदायी फायदे. त्यामुळेच डॉक्टर आहारात या माशाचा समावेश करण्याचा सल्ला देत आहेत.
5/10
आजकाल जवळपास प्रत्येक घरात मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराची समस्या दिसते. पण नियमित खाल्ल्यास एक खास मासा या सगळ्यावर नियंत्रण ठेवू शकतो.
6/10
हा मासा म्हणजे 'भोला भेटकी'. तो रक्तदाब कमी करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, यकृताच्या तक्रारी दूर करतो आणि मधुमेहाशी लढण्यात प्रभावी ठरतो.
7/10
पश्चिम मेदिनीपूरमधील बेलडा कॉलेज, विद्यासागर विद्यापीठ आणि राजा नरेंद्रलाल खान महिला महाविद्यालय येथील प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासातून या विषयावर महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. हा संशोधन प्रकल्प 2017-18 मध्ये सुरू झाला होता.
8/10
प्राध्यापक आणि संशोधकांच्या मते, हा मासा खाल्ल्याने रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसेच तो सांधेदुखी कमी करतो आणि मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनाही हलक्या करतो.
9/10
उंदरांवर झालेल्या प्रयोगांमधून स्पष्ट झाले आहे की 'भोला भेटकी' हा सागरी मासा रक्तातील साखर लक्षणीयरीत्या कमी करतो. आहारात याचा समावेश केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहते, हे सिद्ध झाल आहे.भविष्यात या माशाचे कॅप्सूल स्वरूपात औषधही उपलब्ध होऊ शकते.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola