Protein Powder : प्रोटीन पावडर घेणं आवश्यक आहे का?
प्रोटीन पावडर सर्वांसाठी आवश्यक नसते अनेकांना रोजच्या आहारातूनच पुरेसे प्रोटीन मिळू शकते. मात्र जास्त व्यायाम करणाऱ्या किंवा अतिरिक्त प्रोटीनची गरज असलेल्या लोकांसाठी ते उपयुक्त ठरू शकते.
Continues below advertisement
प्रोटीन पावडर
Continues below advertisement
1/8
प्रोटीन पावडर घेणं प्रत्येकासाठी आवश्यक नसतं.
2/8
बहुतेक लोकांना रोजच्या आहारातून दूध, अंडी, कडधान्ये, डाळी, मांस, अक्रोड, पनीर यांसारख्या पदार्थांमधून पुरेसं प्रोटीन मिळू शकतं.
3/8
मात्र ज्यांचा व्यायामाचा स्तर जास्त असतो, वजन वाढवायचं किंवा कमी करायचं असतं
4/8
जिममध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा बॉडीबिल्डिंग करतात, त्यांना अतिरिक्त प्रोटीनची गरज भासू शकते.
5/8
अशावेळी प्रोटीन पावडर हा सोपा आणि जलद पर्याय ठरतो.
Continues below advertisement
6/8
पण चुकीचा प्रकार, जास्त प्रमाण किंवा निकृष्ट दर्जा घेतल्यास पचन समस्या, मूत्रपिंडांवर ताण आणि ऍलर्जीची शक्यता वाढू शकते.
7/8
म्हणूनच प्रोटीन पावडर आवश्यक आहे का नाही, हे तुमच्या आहार, शरीराची गरज आणि व्यायामाच्या पातळीवर अवलंबून असतं.
8/8
शक्य असल्यास डॉक्टर किंवा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घेऊनच योग्य प्रोटीन निवडणं चांगलं.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 27 Nov 2025 03:23 PM (IST)