Tips To Prevent Hair Fall: ओल्या केसांवर कधीही गुंडाळू नका टॉवेल! उद्भवू शकतात 'या' समस्या

Tips To Prevent Hair Fall: अनेक लोक केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळतात. पण केस धुतल्यानंतर लगेच त्यावर टॉवेल गुंडाळल्याने तुम्हाला कोंडा किंवा इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो.

Tips To Prevent Hair Fall

1/7
ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच वेळ ओले राहते, त्यामुळे कोंडा होऊ शकतो.
2/7
केस धुतल्यानंतर ते टॉवेल गुंडाळल्याने स्कॅल्पला फंगल इंफेक्शन (Fungal infection) होऊ शकते.
3/7
ज्यांना केस गळण्याची (Hair Fall) समस्या आहे त्यांनी ओल्या केसांना चुकूनही टॉवेल गुंडाळू नये. कारण ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळल्यानं तुटतात.
4/7
ओल्या केसांना टॉवेल बांधल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, तसेच केस गळण्याची समस्याही वाढते.
5/7
ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांची नॅचरल शाइन निघून जाते, तसेच केस कोरडे होऊ शकतात.
6/7
केस धुतल्यानंतर थोड्यावेळ मोकळे सोडा. त्यानंतर ड्रायरनं तुम्ही केस ड्राय करु शकता.
7/7
काही वेळ केस मोकळे सोडले तरी देखील ते सुकतात, अशा पद्धतीने केस ड्राय केल्यानो केसांवरील नॅचरल शाइन (Natural Shine) निघून जाणार नाही.
Sponsored Links by Taboola