PHOTO: हिवाळ्यात चुकवू नका ही ठिकाणं फिरण्याचा प्लॅन ,आजच बुक करा तिकिट
जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर तुम्ही हिवाळ्यात कुठेना कुठे जाण्याचा बेत आखत असाल. पण कोणत्या ठिकाणी जायचं हे तुम्ही अजून ठरवलं नसेल तर एकदा या ठिकाणांचा विचार करा.
Continues below advertisement
हिवाळ्यात चुकवू नका ही ठिकाणं फिरण्याचा प्लॅन ,आजच बुक करा तिकिट
Continues below advertisement
1/8
जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर तुम्ही हिवाळ्यात कुठेना कुठे जाण्याचा बेत आखत असाल. पण कोणत्या ठिकाणी जायचं हे तुम्ही अजून ठरवलं नसेल तर एकदा या ठिकाणांचा विचार करा. कारण हिवाळ्यात कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी ही सर्वात सुंदर ठिकाणं आहेत जिथे तुमचा खर्चही तितकासा होणार नाही.
2/8
गुलमर्ग : बर्फवृष्टीत फिरायला जायचं असेल तर बॅग पॅक करून काश्मीरला निघा. हिवाळ्यात गुलमर्ग पर्यटकांनी खचाखच भरलेलं असतं. येथील बर्फवृष्टीचे दृश्य आयुष्यभर स्मरणात राहील. पर्यटकांसाठी इथे हिवाळ्यातील उपक्रमही असतात . इथे येऊन तुम्हाला आनंद होईल.
3/8
डलहौसी : हिवाळ्यातही हिमाचल प्रदेश पर्यटकांनी खचाखच भरलेला असतो. सिमला, कुल्लू-मनाली ला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात. जर तुम्ही या ठिकाणांना भेट दिली असेल तर या हिवाळ्याच्या सुट्टीत डलहौसीचे प्लॅनिंग करा. डलहौसीला लिटिल स्वित्झर्लंड असेही म्हणतात. डोंगर, धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्याचे अतिशय सुंदर नजारे तुमची सहल संस्मरणीय बनवतील. डलहौजीबरोबरच आजूबाजूचा सुभाष बावली, बरकोटा हिल्स, पंचपुला असा परिसरही पाहायला मिळतो.
4/8
जैसलमेर : बर्फवृष्टी किंवा थंडीच्या काळात आल्हाददायक हवामान असलेल्या ठिकाणी जायचे असेल तर राजस्थानला जा. हिवाळ्यातही जैसलमेर पर्यटकांनी खचाखच भरलेले असते. वाळवंटात कॅम्पिंगसोबतच पॅरासेलिंग, क्वॉड बाइकिंग आणि ड्युन बॅशिंगचा आनंद घेता येतो. जैसलमेरमध्ये फोर्ट, थार म्युझियम, जैन मंदिर, नथमल की हवेली अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
5/8
मुन्नार : मुन्नार हे केरळमध्ये आहे, जिथे नेहमीच आल्हाददायक हवामान पर्यटकांना आकर्षित करते, परंतु हिवाळ्यात या ठिकाणी फिरण्याचा एक वेगळाच आनंद असतो. मुन्नारला दक्षिण भारतातील काश्मीर म्हटले जाते. हनीमून कपल्ससाठी ही जागा उत्तम आहे. हाऊसबोटिंगचा आनंद घेण्याबरोबरच चहाच्या बागा, कोची किल्ला आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी इथे आहेत.
Continues below advertisement
6/8
राणीखेत :उत्तराखंडच्या कुमाऊं प्रदेशातील राणीखेत हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, जे खूप प्रसिद्ध ही आहे. कॅम्पिंगबरोबरच अनेक प्रकारच्या क्रीडा उपक्रमांचा ही आनंद येथे घेता येतो. याशिवाय चौबटिया गार्डन, माझाखली आणि झुलदेवी मंदिरही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. रानीखेत हे दिल्लीपासून365 किमी अंतरावर आहे.
7/8
ऋषिकेश : पवित्र गंगा नदीच्या काठावर वसलेले ऋषिकेश हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर साहसी जलक्रीडा आवडणाऱ्या पर्यटकांसाठीही उत्तम ठिकाण आहे. हे दिल्लीपासून 229 किमी अंतरावर आहे, जिथे आपण रेल्वे, बस किंवा विमानाने जाऊ शकता. रेल्वेने जायचे असेल तर येथे 200 ते 1400 पर्यंत एकतर्फी तिकिटे मिळतील. येथे पर्यटकांना राहण्यासाठी अनेक आश्रम देखील आहेत.
8/8
बिनसर : बिनसर दिल्लीपासून 9 तासांच्या अंतरावर आहे. हे ठिकाण वन्यजीव अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला अनेक सुंदर पक्षी पाहायला मिळतील. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही दिल्लीहून काठगोदामपर्यंत ट्रेन पकडता, जे बिनसरच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. इथून कुठल्याही लोकल बसने बिनसरला पोहोचता येते. इथपर्यंत पोहोचण्याचा तुमचा एकूण खर्च सुमारे 2000 रुपये असेल. तिथे जेवायला आणि हॉटेलमध्ये राहण्यासाठी फारसा खर्च येणार नाही.
Published at : 19 Dec 2023 07:45 PM (IST)