Immunity Tips : रिकामी पोटी 'या' 3 गोष्टी खाऊ नका; रोगप्रतिकारकशक्तीवर होईल परिणाम!

Immunity Tips : रिकाम्या पोटी आंबट फळं, ब्लॅक कॉफी किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटाचं संतुलन बिघडतं. योग्य, हलका आणि पौष्टिक नाष्टा केल्याने दिवसभर ऊर्जा आणि आरोग्य टिकून राहतं.

Continues below advertisement

Health Tips

Continues below advertisement
1/12
सकाळी उठल्यावर आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यासाठीच सकाळी रिकाम्या पोटी काही पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
2/12
पोट हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि जर आपली पचनशक्ती नीट राहिली तर त्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहतं.
3/12
जर आपलं पोट बिघडलं तर पोटाशी संबंधित अनेक आजार आपल्याला भेडसावू शकतात. यासाठीच कोणताही पदार्थ खाण्याआधी तो आपल्या पोटासाठी योग्य आहे का याचा विचार करणं फार गरजेचं आहे.
4/12
याचं कारणं म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आपली पचनशक्ती बिघडू शकते.
5/12
सकाळचा पोटभर नाश्ता केल्यानंतरही जर तुम्हाला भूक लागत असेल तर याचा अर्थ तुम्ही पोटभर नाश्ता करत नाही किंवा जो नाश्ता करता तो तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाहीये.
Continues below advertisement
6/12
आंबट फळं जसे की, संत्र, लिंबू, डाळिंब आणि आवळा या फळांमध्ये व्हिटॅमिन C जास्त प्रमाणात आढळते.
7/12
ही फळं तुमच्या रोगप्रतिकारकशक्तीसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. पण जर ही फळं तुम्ही रिकाम्या पोटी खाल्ली तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
8/12
कारण यातील सिट्रिक ऍसिड थेट तुमच्या पोटाच्या आतल्या आतडीवर परिणाम करू शकतं. त्यामुळे तुमच्या पोटात जळजळ, पोटदुखी आणि गॅस निर्माण होऊ शकते.
9/12
जास्त ऍसिडमुळे तुमच्या पोटाचं पीएच संतुलन बिघडू शकतं. तसेच, यामुळे तुमचे दातही कमकुवत होऊ शकतात.
10/12
तुमची पाचनशक्ती निरोगी राहण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून तो पिऊ शकता.
11/12
तसेच सकाळी रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी, तळलेले पदार्थ किंवा पोटभर नाश्ता करणं टाळावं.
12/12
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola