Health Tips: रात्री झोपण्यापूर्वी करू नये 'या' पदार्थांचं सेवन; झोप लागणं होईल कठीण
जास्त तिखट पदार्थांचं सेवन करणं टाळा: रात्री झोपण्याआधी जास्त तिखट पदार्थांचं सेवन करणं टाळा. तिखट पदार्थांचं सेवन केल्याने शरीराचे तापमान वाढतं. ज्यामुळे पोटदुखी, अॅसिडिटी होणे इत्यादी समस्या जाणवू शकते. त्यामुळे झोप लागत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमद्यपान करणं टाळा: तणाव निर्माण झाला किंवा दिवसभर जास्त काम करावं लागलं, तर अनेक लोक रात्री झोपताना मद्यपान करतात. पण रात्री मद्यपान करुन झोपण्याची सवय लागली तर मद्यपान न करता झोप येत नाही. मद्यपान करुनच झोपण्याची सवय लागते.
टोमॅटो खाणं टाळा: झोपण्यापूर्वी टोमॅटो खाऊ नये. टोमॅटोमध्ये ऑक्सालिक अॅसिड असते. ज्यामुळे सतत ढेकर येणे, अॅसिडिटी होणे इत्यादी समस्या जाणवतात. ज्यामुळे झोप लागत नाही. त्यामुळे झोपण्याआधी टोमॅटो खाणं टाळा.
आईस्क्रीम: आईस्क्रीम खायला अनेकांना आवडते. पण आईस्क्रीममुळे शरीरातील कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. या हार्मोनमुळे फ्रेश वाटतं, यामुळे झोप येत नाही. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी आईस्क्रीम खाऊ नये.
चहा-कॉफी: चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळते. हे रक्तदाब वाढवण्याचे काम करते. ज्यामुळे थकवा जातो. चहा आणि कॉफी प्यायल्यानंतर झोप येत नाही. रात्री कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे.
पिझ्झा: पिझ्झा हा देखील अनेकांच्या आहाराचा एक भाग झाला आहे. पिझ्झा हा रात्री खाऊ नका. त्यात बटर आणि टोमॅटोचे मिश्रण असते, ज्यामुळे झोप येत नाही.