Diwali 2025 : फटाके फोडताना त्वचेला इजा झाली? 'अशी' काळजी घ्या! सोप्या टिप्स..
दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि फटाक्यांचा सण आहे. पण तुमच्या त्वचेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जाणून घ्या टिप्स.
Continues below advertisement
Diwali 2025 : दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि फटाक्यांचा सण आहे. पण तुमच्या त्वचेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जाणून घ्या टिप्स. (Photo Credit : Pinterest)
Continues below advertisement
1/11
दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि फटाक्यांचा सण आणि अनेक लोकं दिवाळीत फटाके फोडतात.
2/11
पण तुम्हाला माहित आहे का? फटाक्यांमुळे तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
3/11
फटाक्यांच्या विषारी धुरामुळे तुमच्या त्वचेला हानी होऊ शकते. जर तुम्ही वेळीच काळजी घेतली नाही तर तुमच्या त्वचेवर एलर्जी येऊ शकते.
4/11
अशावेळी तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी वेळीच कशी घ्यायची, जाणून घ्या.
5/11
जर तुम्हाला फटाके फोडताना इजा झाली आणि वेदना होत असेल तर लगेच तुमचा शरीराचा भाग पाण्यात बुडवा.
Continues below advertisement
6/11
फटाक्यांमध्ये खूप रसायने असतात आणि त्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
7/11
जर तुमची त्वचा जळाली असेल तर त्या जागेवर बर्फ लावा किंवा पाण्याने धुवा.
8/11
जर तुमची त्वचा साधारण असेल तर खोबरेल किंवा कडुलिंबाच्या तेलाचा तुम्ही वापर करू शकता.
9/11
उलनच्या कपड्याने लगेच आग लागते, याऐवजी तुम्ही सुतीच्या कपड्याचा वापर करू शकता.
10/11
फटाके फोडून झाल्यावर तुमचे हात-पाय स्वच्छ धुवा आणि मॉइश्च्युराईझरचा वापर करा.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 21 Oct 2025 03:42 PM (IST)