Diwali 2023 : दिवाळीत घराच्या सजावटीसाठी फक्त 'या' 5 गोष्टी वापरा; वातावरणात सकारात्मकता येईल
दिवाळीत घर दिव्यांनी सजवलं जातं. अशा वेळी तुम्ही डेकोरेटिव्ह पणत्यांनी तुमचं घर सजवू शकता. यासाठी तुम्ही घरीच पणत्यांना आकर्षक रंगांनी आणि डिझाईनने सजवू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीत मुलींना जास्त आकर्षण असतं ते रांगोळीचं. अशा वेळी तुम्ही स्वस्तिक, गणपती, मोर, देखावा, सरस्वती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळीच्या डिझाईन काढून तुमच्या घराला शोभा देऊ शकता.
तसेच, तुम्हाला तुमच्या रांगोळीला आणखी आकर्षक लूक द्यायचा असेल तर तुम्ही त्यात दिवा किंवा रंगीबेरंगी फुलांचा वापर करू शकता.
सजावटीसाठी अनेक प्रकारचे आकर्षक दिवे बाजारात उपलब्ध आहेत. पण आजकाल टी लाईट होल्डर आणि कंदील ट्रेंडमध्ये आहेत.
त्यांना लावल्यानंतर, भिंतींवर सावली तयार होते. त्यामुळे घर खूप सुंदर दिसते.
घराला क्लासिक लूक देण्यासाठी इनडोअर रोपे लावा . पीस लिली, एरिका पाम, स्नेक प्लांट आणि पोथोस हे वनस्पतींचे उत्तम पर्याय आहेत.
हे वेगवेगळ्या डिझाइन आणि आकारांच्या प्लांटर्समध्ये तुम्ही घराला छान लूक देऊ शकता.
रंगीबेरंगी फुलं ही कोणत्याही सणाची शोभा अधिक वाढवतात. तुम्हाला देखील तुमचं घर फुलांनी सजवायचं असेल तर तुम्ही झेंडू आणि गुलाबाच्या फुलांचा वापर करू शकता.
विविध फुलांच्या वापराने तुमचं घर अधिकच खुलून दिसेल. आणि घरात सकारात्मकता राहील.
या दिव्यांनी तुमचं घर प्रकाशाने उजळून निघेल. तसेच, घरात एक प्रकारची पॉझिटीव्ह एनर्जी राहील.