Health Tips : चविष्ट 'कॉर्नफ्लेक्स' आरोग्यासाठी नुकसानकारक; शरीरात 'या' समस्या उद्भवू शकतात

Corn flakes : काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉर्नफ्लेक्समध्ये आपल्या शरीराला आवश्यक तेवढे पोषण नसते. त्यात फायबरचे प्रमाणही कमी असते.

Corn flakes

1/8
कॉर्नफ्लेक्समध्ये साखर आणि मीठ जास्त असते, ज्यामुळे मधुमेह, फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणा तसेच उच्च रक्तदाब आणि शरीरात जळजळ होऊ शकते.
2/8
कॉर्नफ्लेक्स फक्त मक्याच्या पिठापासून बनवले जातात असे म्हणतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
3/8
काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कॉर्नफ्लेक्समध्ये आपल्या शरीराला आवश्यक तेवढे पोषण नसते. त्यात फायबरचे प्रमाणही कमी असते. या कारणास्तव, आपल्याला लवकरच भूक लागायला लागते.
4/8
शरीराला योग्य प्रमाणात फायबर मिळणे फार महत्वाचे आहे. कारण त्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
5/8
डॉ. फ्रँक हू यांच्या मते, कॉर्नफ्लेक्समधील साखर आणि मीठ उच्च रक्तदाब आणि जळजळ, मधुमेह, फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणाचे कारण बनते. त्याच्या वापरामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका असतो.
6/8
कॉर्नफ्लेक्स हे पॅकेज केलेले अन्न आहे, जे सहसा दूध आणि साखर मिसळून खाल्ले जाते. कॉर्नफ्लेक्स खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. याचे कारण असे की त्याचे उच्च जीआय सुमारे 93 आहे, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अजिबात चांगले नाही.
7/8
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो त्यामुळे कॉर्नफ्लेक्सचे कमी सेवन करावे. यामुळे तुम्हालाच याचा फायदा होणार आहे. तुम्ही ओट्सचाही नाश्त्यात वापर करू शकता.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Sponsored Links by Taboola