Coriander leaves : थायरॉईडवर मात करण्यासाठी कोथिंबीर गुणकारी; पाहा फायदे
स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या सर्व भाज्यांमध्ये कोथिंबीर ही एकमेव अशी वनस्पती आहे, ज्याच्या गुणधर्मांबद्दल तितके बोलले जात नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया ठिकाणी कोथिंबीरच्या फायद्यांबद्दल बोलण्याबरोबरच, आरोग्याच्या समस्येमध्ये, विशेषतः महिलांसाठी कोथिंबीरीच्या पानांचे महत्त्व जाणून घेणार आहोत.
थायरॉईडची समस्या पुरुषांमध्येही उद्भवत असली तरी या समस्येचा पुरुषांपेक्षा महिलांना जास्त बळी जातो. थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी महिला कोथिंबीरचा वापर कसा करू शकतात
कोथिंबीर खाण्याने मधुमेहाच्या आजारात आराम मिळतो तसेच नैराश्याच्या समस्येवर फायदेशीर आहे.
उच्च रक्तदाब नियंत्रित करतो येतो. तसेच लघवी होत असल्यास त्यावर फायदेशीर आहे.
कोथिंबीर खाल्ल्याने आहारातील फायबर मुबलक प्रमाणात मिळते, जे एक प्रकारचे कार्बोहायड्रेट आहे आणि ते वनस्पतींमधून मिळते.
हिरवी कोथिंबीर कुठेही ठेवली तरी त्याचा सुगंध सर्वांना आकर्षित करतो. याचे कारण त्यात आढळणारे आवश्यक तेल आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.