Guava Benefits: हिवाळ्यात रोज पेरूचे सेवन करा; वजन होईल कमी!
हिवाळ्यात पेरूचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते कारण त्यात अनेक पोषक घटक आढळतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. यासोबतच याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते.
Guava Benefits
1/9
आपण हिवाळ्यात भरपूर अन्न खातो आणि बऱ्याच लोकांना सवय असते की ते थंडीमुळे व्यायाम करत नाहीत. त्यामुळे अशा लोकांचे वजनही वाढते.
2/9
पेरू तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकतो आणि तुमचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
3/9
पेरूमध्ये बी1, बी3, बी6 आणि फोलेट सारख्या गुणधर्मांचा साठा आढळतो. यासोबतच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स देखील असतात.
4/9
यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि हिवाळ्यात याचे सेवन केल्याने सर्दी, खोकला कमी होतो आणि शरीराला अनेक आजारांपासून वाचवते.
5/9
जर तुमचे पोट खराब होत असेल तर तुम्ही या ऋतूत रोज पेरू खावे. यामुळे सकाळी पोट चांगले स्वच्छ होईल आणि तुमच्या पचनाच्या समस्या मुळापासून संपतील. त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होते.
6/9
पेरूमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे फ्री रॅडिकल्स काढून टाकतात आणि तुमचे शरीर डिटॉक्स करतात. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.
7/9
पेरूमध्ये प्रथिने आढळतात जे भूकेशी निगडीत घेरलिन हार्मोन नियंत्रित करते. जे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. याशिवाय याचे सेवन केल्याने भूक कमी होते आणि पोट भरलेले राहते.
8/9
यामध्ये फायबर आढळते आणि वजन कमी करण्यासाठी हे पचन क्षमता सावरणे खूप आवश्यक आहे आणि फायबर पचनशक्ती सुरळीत होण्यास मदत करते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)
Published at : 09 Jan 2023 05:16 PM (IST)