Chicken vs Mutton : चिकन आणि मटण कोणते मांस तुमच्यासाठी अधिक चांगले?

चिकन वजन कमी आणि स्नायू वाढवण्यासाठी योग्य, मटण ऊर्जा आणि ताकद देतो. दोन्ही पौष्टिक, गरजेनुसार निवडा.

Chicken vs Mutton

1/10
चिकन हलके, कमी चरबीयुक्त आणि पोषक तत्व मांस आहे. 100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये 27 ग्रॅम पोषक तत्व असते, जे स्नायू वाढवण्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी चांगले आहे.
2/10
मटनामध्ये सुमारे २५ ग्रॅम पोषक घटक असतात. त्यात चरबी जास्त असते, त्यामुळे कॅलरीही जास्त मिळतात. जास्त ताकद हवी असेल तर मटण चांगले, पण वजन कमी करायच्यांसाठी नाही.
3/10
चिकन कमी कॅलरी आणि जास्त पोषण देतो, हे वजन कमी करण्यासाठी अगदी योग्य आहे. मटण अधिक कॅलरीयुक्त असल्यामुळे ताकद देतो आणि पोट भरलेले ठेवतो.
4/10
चिकन पचायला सोपे असून त्यात कोलेस्ट्रॉल आणि चरबीचे प्रमाण कमी असते. त्यात व्हिटॅमिन B3 आणि B6 जास्त प्रमाणात आहेत, जे ऊर्जा आणि मेटाबॉलिझमसाठी आवश्यक आहेत.
5/10
मटणात आयरन, झिंक आणि B12 भरपूर असते, जे रक्तदोषासाठी फायदेशीर आहे.
6/10
चिकन पटकन शिजते आणि विविध प्रकारे वापरता येते ग्रिल, स्टर-फ्राय, करी किंवा बेक्ड डिशेसमध्ये. ते मॅरिनेशन लवकर शोषते आणि हलके असल्यामुळे रोजच्या आहारासाठी योग्य ठरते.
7/10
मटण शिजवण्यासाठी वेळ लागतो आणि ते मंद आचेवर शिजवल्यास त्याची चव उत्तम येते. बिर्याणी, रस्सा किंवा पारंपारिक करीसाठी ते आदर्श असले तरी ते पचायला जड असू शकते.
8/10
दोन्ही मांस पौष्टिक आहेत, पण तुमच्या गरजेनुसार निवडा. वजन कमी करायचं किंवा फिटनेससाठी चिकन, उर्जा आणि लोहसाठी मटण योग्य आहे.
9/10
हृदय आणि कोलेस्ट्रॉलसाठी चिकन सुरक्षित आहे, मटण मर्यादित खावे.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola