काय सांगता! डायटमध्ये वडा-पाव खाऊ शकता? जाणून घ्या!

एक वडा-पाव साधारणतः 250-350 कॅलोरी देतो. जर तुमचं एकूण दिवसभराचं कॅलोरी सेवन नियोजनबद्ध असेल, तर हा एक वडा-पाव तुमच्या डायटमध्ये बसू शकतो – विशेषतः cheat meal म्हणून.

Continues below advertisement

वडा-पाव

Continues below advertisement
1/10
बहुतेकांना वाटतं की वडा-पाव म्हणजे तळलेलं, तेलकट आणि आरोग्यास अपायकारक खाणं. प
2/10
पण हा फक्त एक दृष्टिकोन आहे. खऱ्या अर्थानं बघितलं तर वडा-पावमध्ये बटाटा, बेसन आणि पाव असतो – हे घटक संतुलित प्रमाणात घेतले तर वाईट ठरत नाहीत.
3/10
एक वडा-पाव साधारणतः 250-350 कॅलोरी देतो. जर तुमचं एकूण दिवसभराचं कॅलोरी सेवन नियोजनबद्ध असेल, तर हा एक वडा-पाव तुमच्या डायटमध्ये बसू शकतो – विशेषतः cheat meal म्हणून.
4/10
आजकाल काहीजण वड्याचा बेक्ड पर्याय निवडतात. तेल कमी, पण बटाट्याची भरच चवदार! अशा वड्याला हिरवी चटणी, लसणाची चटणी आणि संपूर्ण गव्हाच्या पावसह खाल्लं, तर ते कमी फॅट आणि फायबरयुक्त होऊ शकतं.
5/10
डायटिशियन म्हणतात की "तुमचं डायट म्हणजे तुमच्या सवयींचं समतोल." म्हणजेच एखादा वडा-पाव खाल्ला म्हणून डायट बिघडत नाही, पण त्याची वारंवारता, वेळ आणि प्रमाण महत्त्वाचं ठरतं.
Continues below advertisement
6/10
वडा-पाव खायचा असेल, तर दिवसभर थोडं कॅलरी नियंत्रण ठेवा
7/10
वडा घरी तयार करा, शेंगदाण्याचं तेल वापरा, पाव संपूर्ण गव्हाचा वापरा, आणि बटाट्यासोबत थोडी पालेभाजी मिसळा – याने तो अधिक पौष्टिक होतो.
8/10
वडा-पाव हा पूर्णपणे वर्ज्य नाही. अन्नासोबतचा भावनिक संबंध लक्षात घेता, तो कधीमधी खाणं मानसिक समाधानासाठीही आवश्यक ठरतं.
9/10
योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ला, तर वडा-पावही आरोग्यदायी बनू शकतो!
10/10
Q(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola