Can Diabetics Eat Potatoes: मधुमेहात बटाटे खाल्ल्याने शरीरातील साखर वाढते का? जाणून घ्या!
बटाटा ही एक भाजी आहे जी जवळपास प्रत्येक घरात वापरली जाते. ही भाजी शाकाहारी ते मांसाहारी, नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत आणि स्नॅक्सपर्यंत सर्व प्रकारच्या डिशमध्ये बसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण मधुमेही रुग्णांनी बटाटे खाऊ नयेत, असा सर्वसामान्यांचा समज आहे. हे खाल्ल्याने साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते.
पण बटाटा कमी प्रमाणात खाल्ले आणि योग्य प्रकारे शिजवले तर ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुपरफूड ठरू शकते, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.
बटाटे तळून किंवा उकळण्याऐवजी भाजून खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.
अभ्यास अहवालानुसार, रोज बटाटे खाणाऱ्यांची रक्तातील साखरेची पातळी घसरते. याशिवाय बटाटा हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतो.
पोटॅशियम बटाट्यामध्ये आढळते. हे खाल्ल्याने जास्त दिवस भूक लागत नाही. अशा स्थितीत ज्यांना वजन कमी करायचे आहे ते आपल्या आहारात बटाट्यांचाही समावेश करू शकतात.
बटाटे भाजून व्यवस्थित शिजवले तर ते सुपरफूड आहे. तसेच कंबरेची जाडी कमी करण्यास मदत होते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. ) (pc:unplash)