Calcium Rich Food : शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
Calcium For Health : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आरोग्यासाठी महत्वाचे आहे. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी बहुतेक लोक आहारात दूध, दही आणि चीजचे सेवन करतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होत असतात. पण काही लोक दूध, दही, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत. पण दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिरे - जिरे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जिरे खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊ शकते. यासाठी तुम्ही 1 ग्लास पाणी उकळा त्यात 1 टीस्पून जिरे घाला. पाणी थंड करून दिवसातून किमान दोनदा प्या.
आवळा - आवळ्यातदेखील भरपूर कॅल्शिअम असते. याशिवाय आवळ्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आवळा ज्यूस किंवा पावडरच्या स्वरूपातही खाऊ शकता.
नाचणी - नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॅल्शियमसाठी नाचणीचा आहारात समावेश करावा. नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. खीर किंवा भाकरी बनवून खाऊ शकता.
तीळ - हिवाळ्यात तीळ खूप फायदेशीर आहे. तीळ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. एक टेबलस्पून तिळात सुमारे 88 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. सूप, तृणधान्ये किंवा सॅलडमध्ये तीळ घालून त्याचा वापर करता येतो. हिवाळ्यात तिळाचे लाडूदेखील फायदेशीर असतात.