Black Pepper Benefits : स्वयंपाकातील काळीमिरीचे आहेत अनेक फायदे
काळी मिरी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. याचं सेवन करण्यासाठी विविध प्रकार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही रोज काळी मिरी खाल्ल्यास तुम्ही अनेक मौसमी आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता.
मधुमेहाचे रुग्णही सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी खाऊ शकतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते.
हार्मोनल असंतुलनाच्या समस्येतून जात असलेल्या महिलांनी सकाळी रिकाम्या पोटी एक काळी मिरी कोमट पाण्यासोबत खाल्ली तर चांगला परिणाम दिसेल.
दररोज एक काळी मिरी खाल्ल्याने तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता आणि प्रतिकारशक्ती वाढवू शकता.
एक काळी मिरी बारीक करून घ्या किंवा चिमूटभर काळी मिरी पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळा.
रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी एक तास आधी हे मिश्रण खा. किंवा जेवणानंतर एक तासानंतर दिवसाच्या कोणत्याही वेळी सेवन करा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
जर तुम्हाला जास्त तणाव जाणवत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा देशी गाईच्या तुपात चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळून त्याचे सेवन करू शकता. ही पद्धत चयापचय वाढवण्यास देखील मदत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.