Health Tips : दिवसातून 'या' वेळेत दुधाचे सेवन केले तर शरीराला मिळतील अनेक फायदे

एखाद्या गोष्टीचे योग्य वेळी सेवन केले नाही तर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आयुर्वेदानुसार कोणतीही गोष्ट वापरण्याची एक वेळ असते. यामध्ये दूध पिण्याची योग्य वेळदेखील सांगण्यात आली आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी कधीही दुधाचे सेवन केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वृद्ध व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी दुधाचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच अनेक आजारांपासून आराम मिळतो.
जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या असेल तर रात्री फक्त दूध घ्या. याचा फायदा तुम्हाला मिळेल.
एक ग्लास कोमट दूध तुमचा दिवसभराचा थकवा दूर करेल. तसेच तुम्हाला चांगली आणि गाढ झोप लागेल.
आयुर्वेदात रात्री दूध पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. मात्र, दुपारच्या वेळीही तुम्ही दूध पिऊ शकता.
दुधात हळद मिसळून पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.